'पृथ्वीराज चौहान'चे न पाहिलेले पैलू...पहा ट्रेलर

    दिनांक :14-May-2022
|
मुंबई,
Prithviraj Chauhan गेल्या ३ वर्षांपासून सुरू असलेली प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपत आली आहे. लवकरच हा चित्रपट पडद्यावर दिसणार आहे. दरम्यान आज या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये पृथ्वीराज चौहान यांची कहाणी उत्तम प्रकारे दाखवण्यात आली आहे. या संपूर्ण ट्रेलरमध्ये भावना आणि युद्ध यांचा उत्तम समतोल आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली चित्रपटातील युद्धाची दृश्ये वेड लावण्यासाठी पुरेशी आहेत.
 
 
treler
 
नावाप्रमाणेच या चित्रपटाची कथा भारताचे महान राजा पृथ्वीराज चौहान Prithviraj Chauhan यांच्यावर आधारित आहे. पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक पैलू या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. त्यांच्या प्रेमकथेचाही समावेश आहे. सामान्यतः जेव्हा आपण पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दल बोलतो तेव्हा त्यांच्या शौर्याबद्दल आणि पराक्रमाबद्दल बोलतो. पण त्यांची प्रेमकहाणीही या चित्रपटात छान दाखवण्यात आली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मानुषी छिल्लर राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत अप्रतिम काम करताना दिसत आहे. याशिवाय सोनू सूद आणि संजय दत्त सारख्या अभिनेत्यांनी अॅक्शनचा टच जोडण्यात कोणतीही कसर सोडली नाही.