मृत्यूपूर्वी दिलेला पत्नीचा बयाण होणार पुरावा- न्यायालय
दिनांक :14-May-2022
|
नवी दिल्ली,
पतीने पत्नीवर केलेल्या wife statement क्रौर्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, मृत्यूपूर्वी दिलेले पत्नीचे विधान पुरावा कायद्यांतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 498A अंतर्गत आरोपांच्या खटल्यादरम्यान ग्राह्य धरले जाईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. तथापि, पुरावे स्वीकारण्याआधी काही पूर्व शर्ती पूर्ण कराव्या लागतील, असे सांगितले.