शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी

महागाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा फज्जा

    दिनांक :14-May-2022
|
तभा वृत्तसेवा
महागाव, 
पोषण आहाराचा भ्रष्टाचार Shiv Sena taluka chief उघड न करण्यासाठी पिस्तुलचा धाक दाखवून शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या दोन अज्ञात इसमांविरोधात महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
Shiv Sena
 
महागाव तालुकाशिवसेना प्रमुख प्रमोद भरवाडे Shiv Sena taluka chief हे माहिती अधिकार कायद्याच्या आधारे प्रशासनातील अनेक विभागातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार उघडकीस आणत असतात. भरवाडे हे नेहमीप्रमाणे शहरानजिक असलेल्या कलगाव फाट्यावर मंगळवार, 10 मे रोजी दुपारी 2.30 च्या दरम्यान उसाचा रस घेण्यासाठी जात असताना पुस नदीचा पूल ओलांडल्यावर मागून विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांना अडवून पिस्तुल छातीला लावीत पोषण आहाराचे 5 कोटी रुपयांचे प्रकरण दाखल करायचे नाही, एकवेळ संधी देत आहोत, पुन्हा जिवाने मारून टाकू आणि पोलिसात तक‘ार केली तर याद राख अशी धमकी देत निघून गेले.
 
 
धमकी देणार्‍या दोन्ही इसमांनी तोंडाला रुमाल बांधला असल्याने त्यांचे चेहरे भरवाडे Shiv Sena taluka chief यांना ओळखू आले नाहीत. या अचानक घडलेल्या प्रकाराने भरवाडे यांची भंबेरी उडाली. त्यांनी लगेच महागाव पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेली हकीकत ठाणेदार विलास चव्हाण यांना सांगितली. त्यावरून महागाव पोलिसांनी धमकी देणार्‍या दोन अज्ञात इसमांविरोधात भादंवि 1860 नुसार कलम 341, 506, 34 तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी लक्ष घालावे
मी राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी Shiv Sena taluka chief असल्याने जनतेच्या कामासाठी रात्री बेरात्री बाहेर पडावे लागत असून घडलेला प्रकार फार गंभीर आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने याचा गांभीर्याने तपास करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी महागाव नगर पंचायतचे आरोग्य सभापती व शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद भरवाडे यांनी केली आहे.