'या' तीन स्टार किड्सचा चित्रपट येणार

    दिनांक :14-May-2022
|
मुंबई,
Star Kids सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा नेटफ्लिक्स चित्रपट 'द आर्चीज'मधून पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. या चित्रपटात झोया अख्तर कॉमिक बुक कॅरेक्टर आर्ची अँड्र्यूज आणि त्याच्या मित्रांना भारतीय लूक देणार आहे. OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा सेट 1960 च्या भारतातील सेटवर आहे. 18 एप्रिल 2022 रोजी 'द आर्चीज'चे शूटिंग सुरू झाले. नेटफ्लिक्स इंडियाने त्याचे फर्स्ट-लूक पोस्टर नुकतेच जारी केले आहे.
 
 
archis
 
चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट Star Kids लूक शेअर करताना निर्मात्यांनी माहिती दिली की 'द आर्चीज'मध्ये सुहाना खान 'वेरोनिका'ची, खुशी कपूर 'बेट्टी' आणि अगस्त्य नंदा 'आर्चीज'ची भूमिका साकारत आहे. 'द आर्चीज'मध्ये सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्याशिवाय मिहिर आहुजा, डॉट, वेदांग रैना आणि युवराज मेंडा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. नेटफ्लिक्स इंडियाने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून 'द आर्चीज'चे पोस्टर शेअर  केला आहे.