आश्चर्य...कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला 210 कोटींचा बोनस

    दिनांक :14-May-2022
|
लास वेगास,
Surprise कर्मचारी वर्गाच्या दृष्टीने अतिशय आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी चक्क 210 कोटींचा बोनस जाहीर केला आहे. जवळपास 5400 कर्मचाऱ्यांना 4-4 लाख रुपये प्रति याप्रमाणे हा बोनस देण्यात येणार आहे. अमेरिकेतील लास वेगासमधील कॉस्मोपॉलिटन कंपनीच्यावतीने घडलेली ही घटना आहे.

Surprise 
 
Surprise 2010 मध्ये सुरु झालेले कॉस्मोपॉलिटन हे लास वेगासमधील अतिशय आकर्षक स्ट्रिप रिसॉर्ट आहे. सुरुवातीच्या काळात ते मोठ्याप्रमाणात तोट्यात गेले. पण त्यानंतर 2014 मध्ये ब्लॅकस्टोनने ते 131 अब्ज रुपयांना विकत घेतले. कॉस्मोपॉलिटन रिसॉर्ट कंपनीचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आणि थक्क करणारा आहे.
 
Surprise कॉस्मोपॉलिटनचे डॅनियल एस्पिनो म्हणतात, तुम्ही खोली स्वच्छ करत असाल, जेवण तयार करत असाल, कार्ड्स सांभाळत असाल, ड्रिंक्स सर्व्ह करत असाल किंवा फ्रंट डेस्कवर काम करत असाल. तुम्ही जे काही करत असाल त्यातूनच प्रत्येक दिवस खास बनतो आणि तुम्ही तो बनवता. कोरोना महामारीच्या काळात चांगले वातावरण राखल्याबद्दल कंपनीने कर्मचाऱ्यांना हे बक्षीस दिले आहे. 2014 मध्ये ब्लॅस्टोनने ही कंपनी विकत घेतली होती. गेल्या 7 वर्षात मॅकबेथ यांच्या रिसॉर्टने चॅरिटीसाठी जवळपास 70 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी कंपनीला जवळपास 210 कोटी रुपये लागणार असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे.