त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांचा राजीनामा

- विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होणार

    दिनांक :14-May-2022
|
नवी दिल्ली, 
त्रिपुराचे मुख्यमंत्री Tripura CM बिप्लब कुमार देब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. खुद्द बिप्लब देब यांनी याला दुजोरा दिला आहे. आता तिथे नवा मुख्यमंत्री निवडला जाईल. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे केंद्रीय निरीक्षक म्हणून आगरतळा येथे पोहोचले आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय होणार आहे.
  
Tripura CM