तुरुंगातून व्हीआयपी संस्कृती बंद होणार

    दिनांक :14-May-2022
|
पंजाब,
VIP culture पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी पंजाब राज्यातील तुरुंगांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब तुरुंगात सुरू असलेली व्हीआयपी परंपरेवर त्यांनी बंदी घातली आहे.यासोबतच कारागृहातून आता काळा धंदा चालणार नाही असे स्पष्ट केले आहे. दरम्यान या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल, असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याचवेळी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी काही निष्काळजी अधिकाऱ्यांनाही निलंबित केले आहे. आमचे सरकार पंजाबमधील व्हीआयपी संस्कृती संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे म्हणणे आहे. आता सर्व व्हीआयपी रूमचे व्यवस्थापन रद्द करण्यात येणार असून त्यात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. 
 
 
maan
 
ते म्हणाले की, कारागृहातील VIP culture सर्व व्हीआयपी रूम्स जेल मॅनेजमेंट ब्लॉकमध्ये रुपांतरित केल्या जातील. भगवंत मान म्हणाले,  कारागृह परिसरातून गुंडांचे ७१० मोबाईल जप्त करण्यात आले आहे. केवळ मोबाईल जप्त केले नाही तर आत फोन ठेवणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. त्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय चंदीगडमध्ये पोलिसांशी झालेल्या झटापटीचे प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांना मुख्य न्यायदंडाधिकारी अमनिंदर सिंग यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दोन वर्षांपूर्वी चीमा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक आमदार आणि आपचे नेतेही या प्रकरणात आरोपी आहेत. मात्र, मुख्यमंत्री मान आणि अन्य नेत्यांनी यापूर्वीच अटकपूर्व जामीन घेतला आहे.