कंपनीच्या धुरामुळे होणार्‍या त्रासावर उपाययोजना करा

अन्यथा आंदोलन करण्यात येईल

    दिनांक :14-May-2022
|
तभा वृत्तसेवा
झरीजामणी, 
झरी तालुक्यातील अडेगाव company fumes परिसरात ईशान मिनरल्स जगती माइन्स, सूर्या केमिकल, पैनगंगा मिनरल्स कंपन्या असून ओवरलोड वाहतुकीमुळे अडेगाव-खडकी रस्ता अतिशय खड्डेमय झाला असून त्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. आजूबाजूच्या शेतकरी व वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. यावर कोणत्याही कंपनीकडून उपाययोजना करण्यात आल्या नसून विश्वास नांदेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा, तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार रामगुंडे यांना निवेदनातून कार्यवाहीची मागणी केली आहे.
 
company fumes
 
अडेगाव परिसरात अनेक कंपन्या company fumes असून त्या कंपनीमधील माल अडेगाव-खडकी या रस्त्याने इतरत्र ठिकाणी वाहतूक करावी लागत असून हा रस्ता मात्र खराब झाला आहे. त्या रस्त्यावरील धूळ शेतकर्‍यांच्या शेतातील पिकावर पडल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.
 
 
त्या परिसरातील कंपनीचे व्यवस्थापक company fumes मात्र या उपाययोजनेकडे दुर्लक्ष करीत असून या रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावे व रोडवर पाणी टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर उपयोजना न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना युवा तालुका प्रमुख नीलेश बेलेकार यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी उपतालुका प्रमुख सीताराम पिंगे, दत्ता परचाके, राजू लोडे, चेतन बारशेट्टीवार, विजय लोडे, शंकर पाचभाई, संजय थेरे, स्वप्नील आगरकर, राहुल राजूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.