पाणी हे मानवाच्या गुरूस्थानी !

आर्य रविदेव गुप्ता यांचे प्रतिपादन

    दिनांक :14-May-2022
|
नागपूर, 
मानवाने पाण्याला water गुरूस्थानी ठेवल्यास त्याची प्रगती होईल. पाण्याला water उकळी आली की ते औषध बनते. अर्थात, त्याची गुणवत्ता सुधारते. मानव संतापला की त्याच्या गुणवत्तेचा -हास‌ होईल. पण, प्रत्येक अवस्थेत गुणवत्तापूर्ण राहणे, हा पाण्याचा water धर्म आहे, असे प्रतिपादन आर्य रवीदेव गुप्ता Arya Ravidev Gupta यांनी केले.

gupta
 
दिल्लीच्या एकल विद्यालय फाऊंडेशन ऑफ इंडियाचे Ekal Vidyalay Foundation of India अध्यक्ष आणि प्रवचनकार आर्य रवीदेव गुप्ता हे ‘जल, विज्ञान आणि अध्यात्म' water science and spirituality या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पाणी water हे पंचमहाभूतांतील एक महत्त्वाचा घटक आहे. पाणी water ही परमेश्वराची देणगी आणि आयुर्वेदानुसार पाणी water हे निव्वळ पेय नाही तर औषध आहे, असे विवेचन त्यांनी केले. सामाजिक समरसता पाण्याकडून शिकायला हवी, असे सांगून पाणी आपल्या मूळ स्थानाला न विसरता प्रवाहीत राहते. यासाठी, पाणी water स्वत:चा मार्ग स्वतःच निर्धारित करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
पाण्याचे water अवलोकन आणि अभ्यास यातून अध्यात्म शिकण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कविवर्य सुरेश भट सभागृहात, कीर्तनाचार्य अण्णाजी पात्रीकर जन्मशताब्दीचे औचित्य साधून, नटराज निकेतन संस्था आणि सम्विद इंटरनॅशनल यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात ते बोलत होते.तत्पूर्वी, अण्णाजी पात्रीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात आजच्या आयोजनाची सुरुवात गार्गी मुकुंद पात्रीकर आणि गायत्री निखिल व्यास या बाल कीर्तनकारांच्या कीर्तनाने झाली.
 
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनातील ठळक प्रसंगांचे वर्णन करीत तयारीने कीर्तन केले. या दोघींच्या माध्यमातून अण्णाजी पात्रीकर यांच्या कीर्तनाची परंपरा कायम राहणार, यात शंका नाही. या आयोजनाची संकल्पना सम्विद इंटरनॅशनलचे संचालक मुकुंद पात्रीकर यांची आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक प्रकाश एदलाबादकर यांनी केले.
कीर्तन महोत्सवात आज...
ह.भ.प. अण्णाजी पात्रीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ कीर्तनकार दिलीप डबीर यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस Netaji Subhashchandra Bose यांच्या जीवनावरील कीर्तनाने होईल. राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात प्रवेश नि:शुल्क असून, महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.