मध्य रेल्वेच्या स्थानकावरून 504 मुलांची सुटका

    दिनांक :14-May-2022
|
- चार महिन्यांतील आरपीएफची कामगिरी
 
मुंबई, 
ऑपरेशन nanhe farishte ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत आरपीएफकडून शासकीय रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाईन रेल्वे कर्मचार्‍यांच्या समन्वयातून रेल्वे प्लॅटफॉर्मवरून 504 मुलांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांत ऑपरेशन nanhe farishte  ‘नन्हे फरिश्ते’अंतर्गत आरपीएफकडून सरकारी रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाईन रेल्वे कर्मचार्‍यांच्या समन्वयातून रेल्वे प्लॅटफॉर्मवरून 504 मुलांची सुटका करण्यात आली आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करीत ही माहिती जाहीर केली आहे.
 
 
center relway
 
nanhe farishte  आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे स्थानकावरून यावर्षीच्या गेल्या चार महिन्यांत सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 330 मुले आणि 174 मुलींचा समावेश असून चाईल्डलाईनसार‘या खाजगी संस्थेच्या मदतीने त्यांना त्यांच्या पालकांची भेट करून देण्यात आली. गेल्या वर्षी मध्य रेल्वेच्या स्थानकातून आरपीएफने 603 मुले आणि 368 मुलींची सुटका केली होती. रेल्वेने अलीकडेच स्वयंसेवी संघटनेशी एक सामंजस्य करार करून त्याला ‘सेव्ह द चिल्ड्रन मूव्हमेंट’ असे नाव दिले आहे. त्याच्या माध्यमातून रेल्वेद्वारे मानवी तस्करी थांबवण्यासाठी काम केले जाते. काही वेळेस कौटुंबिक समस्या किंवा चांगल्या आयुष्याच्या शोधात रेल्वे स्थानकांवर भटकलेल्या मुलांची प्रशिक्षित आरपीएफ कर्मचार्‍यांकडून सुटका केली जाते. नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्या चिल्ड्रन्स फाऊंडेशनसोबतही आरपीएफ जुळलेली आहे. आरपीएफचे ऑपरेशन ‘आहत’देखील (मानवी तस्करी विरुद्ध कारवाई) सुरू केले आहे. 2022 साली गेल्या चार महिन्यात मध्य रेल्वेअंतर्गत येणार्‍या विविध विभागांच्या स्थानकांवरून सुटका करण्यात आलेल्या मुलांची संख्या अशी- मुंबई (206 मुले आणि 79 मुली), पुणे (50 मुले आणि 21 मुली), भुसावळ (47 मुले आणि 45 मुली), नागपूर (12 मुले आणि 45 मुली) व सोलापूर (15 मुले आणि 9 मुली).