देवाचा बाप...!

sharad pawar हा संभ्रम साहेबांनी दूर केला तर बरं

    दिनांक :14-May-2022
|
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
sharad pawar पाठीमागच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात विठ्ठल, पंढरी म्हणून वावरत असलेला, बिरुदं लावून फिरत असलेला आता ‘देवाचा बाप' असल्याचे या महाराष्ट्राला नुकतेच कळाले आहे. मात्र, आम्ही आजवर विठ्ठल समजत आलो तो आता त्याचाही बाप निघाला. आता विठ्ठल की विठ्ठलाचा बाप हा संभ्रम तेवढा साहेबांनी sharad pawar दूर केला तर बरं होईल, नाही का...?
   

sp  
 
  
साता-याच्या भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात शरद पवार sharad pawar  यांनी ‘‘साल्यांनो, आम्ही तुमच्या देवाचे बाप आहोत...'' असा थोडक्यात आशय असलेल्या कोण्या एका ऐकिवात नसलेल्या कवीच्या कवितेच्या ओळी म्हणून दाखविल्या आणि बघता बघता अवघ्या हिंदू समाजात एक प्रकारे आक्रोश निर्माण झाला. हा जनक्षोभ बघून देवाच्या बापाला आणि बापाच्या पक्षाला हे माझे शब्द नसून त्या कवीच्या कवितेतील ओळी आहेत; ज्या मी केवळ बोलून दाखविल्याचा खुलासा करावा लागला. हेही नसे थोडके...
‘‘आम्ही पाथरवट, निर्माण करतोय् चक्कीचे पाट
ज्या पाटाने पीठ आणि रोटी दिली तुम्हाला,
आम्ही मात्र अन्नाच्या कण्यासाठी रोज नुसती घरघर करतोय
दुसरं काय तर आमचं दुर्दैव 
आम्हीच निर्माण केलेल्या जात्यातून आम्हीच पिसले जातोय्
आमच्या छिन्नी आणि हातोड्यांनी, एकदा तर कमाल केली
पाषाणातून वेरुळ, अजिंठा कोरली गेली,
उद्ध्वस्त झालेल्या आमच्या आयुष्याच्या आरशातून
शिल्पाचं सौंदर्य तुम्ही पाहता अन् म्हणता
वा! वाहवा! बहुत खूबसुरत!
तुमच्या ब्रह्मा, विष्णू, महेशाला, लक्ष्मी अन् सरस्वतीला
आम्हीच रूपडं दिलंय, आता तुम्ही खरं सांगा
ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता?
अरे! आमच्या छन्नी आणि हातोड्याने
कार्ल मार्क्ससारखा आधुनिक योद्धा, आमच्याजवळ इंद्राचं सोंग घेऊन आला...''
ही आहे ती शरद पवारांनी दाखला दिलेली जवाहर राठोड यांच्या मूळ कविता संग्रहातील ‘पाथरवट' कविता. या कवितेत कुठेही ‘साल्यांनो' आणि ‘बाप' या शब्दाचा वापर केलेला दिसत नाही.
 
पवारांसारख्या sharad pawar  ज्येष्ठ नेत्याने राजकारणातल्या पितामहाने, चाणक्याने आणि स्वयंभू विठ्ठलावताराने अशा शब्दांचा वापर का म्हणून करावा? उदाहरणच द्यायचं होतं तर, त्याच ओळी म्हणायच्या होत्या. पण तुम्ही त्यात स्वतःचे शब्द टाकून त्या कवितेवर, त्या कवीवर आणि साक्षात परमेश्वरावर शिंतोडे उडविण्याचे पाप का म्हणून केले? पवारांना sharad pawar खरंच भटक्या विमुक्तांच्या व्यथा मांडायच्या होत्या की, मग नवा वाद उपस्थित करून राजकीय स्वार्थ साधण्याचा आणि त्या माध्यमातून पुन्हा चर्चेत राहण्याचा हा प्रयत्न समजावा की, संगतीचा परिणाम. अलीकडे संजय राऊतांचा सहवास जास्त असल्याने कदाचित सातत्याने त्यांच्या संपर्कात राहिल्याने पवारांच्या शब्दकोशात वाढ झाली आणि ते राऊतांप्रमाणे शब्दप्रयोग करू लागले की काय, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
 
पवारांनी केलेले शब्दप्रयोग मूळ कवितेत नसताना कवितेचे शब्द बदलून जाहीरपणे एकदा नव्हे तर, दोन-दोन वेळा खोडसाळपणा करणा-या शरद पवारांनी sharad pawar  दुखावलेल्या हिंदू समाजाची माफी मागावी की उलट भाजपाने दिशाभूल केली, त्यांनी माफी मागावी? हा सारा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणावं लागेल. बाळासाहेबांचं हिंदुत्व विज्ञानवादी पुरोगामी होते, असं मुख्यमंत्र्यांच्या मुखपत्राच्या अग्रलेखात म्हटलं आहे. आपल्या सोयीनुसार हिंदुत्वाची व्याख्या बदलणा-या शिवसेनेला सत्तेसाठी शरद पवार sharad pawar  जे बोलले त्याचे समर्थन करण्याची वेळ आली आहे. जवाहर राठोड यांच्या कवितेत कुठेही ‘साल्यांनो, तुमच्या मंदिरात आम्हाला प्रवेश नाही' अशी विधाने नाहीत. कवितेची मोडतोड करून ती म्हणायची आणि त्याचे केविलवाणे समर्थन शिवसेनेला करावे लागावे, यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असू शकते. कदाचित मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या नवहिंदू या व्याख्येत ते बसत असावे... मुळात आता यावेळी एकत्र आलेल्या तीन पक्षांच्या नेत्यांच्या सवयीचा हा भाग आहे. हे लोक समविचारी असल्याचे पुन:पुन्हा सिद्ध करताना दिसत आहेत. पहिले यांच्या तीनपैकी एका पक्षाने देशाच्या पंतप्रधानांचा बाप काढला होता. आता त्यांच्याच मित्रपक्षाने देवाचा बाप काढला. एकूणच काय, तर खालच्या पातळीची समान मानसिकता, निंद्य प्रवृत्ती आणि विचारच म्हणावे लागेल.
 
तसं तर पुरोगामी असलेले साहेब,sharad pawar साहेबांची मुलगी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा धर्मनिरपेक्षतेचा भला मोठा इतिहास आहे. पालघरमध्ये साधूंचे हत्याकांड झाले होते; साहेब बोलत नाहीत. मुलगीही मौनव्रतात असते. यांच्या पक्षाचा एक आमदार हिंदू  विवाह पद्धती आणि महिलांविषयी अवमानकारक शब्दप्रयोग करतो. साहेब स्थानिक; विषयात पडत नाहीत. ताई खासदार असल्याने त्या राष्ट्रीय पातळीवरचे विषय हाताळत असल्याने या विषयात पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण दुसरीकडे मुंबईत १२ साखळी बॉम्बस्फोट हिंदुबहुल परिसरात झाले. पण साहेबांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी ही वस्तुस्थिती सांगण्याची हिंमत केली नाही. उलट एक नवा १३ वा बॉम्बस्फोट मुस्लिम भागात झाल्याचा खोटा दाखला मुख्यमंत्र्यांसारख्या संवैधानिक पदावर बसून दिला. पुण्याच्या विद्यालयात सत्यनारायणाची पूजा घातली म्हणून महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे.
 
sharad pawar  ज्या काही पूजा घालायच्या असतील त्या स्वतःच्या घरी घाला, अशी धार्मिकता शैक्षणिक संकुलात नको, अशा शब्दात तडकवणा-या ताई मात्र अलिकडे उद्भवलेल्या हिजाब वादावर मात्र बोलताना दिसल्या नाहीत. उलट त्यांचा पक्ष समर्थनात रस्त्यावर उतरल्याचे दिसले. हिंदू दहशतवाद म्हणून जाहीरपणे बोलणा-यांनी, जिहादी दहशतवादाविषयी कधीही जाहीरपणे बोलण्याचे धाडस दाखविले नाही. sharad pawar  त्यामुळे औरंगजेबाला सुफी संत म्हणणा-या, इशरत जहाँच्या नावाने अ‍ॅम्ब्युलन्स काढणा-या, देशाविरुद्ध युद्ध पुकारणा-या अतिरेकी याकूब मेननला वकील पुरवणा-या, जातीयवाद वाढवणा-या, खोटा व विकृत इतिहास पसरवणाèया, संकष्टीला मुद्दामहून मटण खाणा-या, हनुमान मंदिरात ईफ्तार पार्टीचे आयोजन करणा-या, दाऊद गँगशी व्यवहार करणाèया, व्यभिचारी, भ्रष्टाचारी, बलात्कारी लोकांनी भरलेल्या पक्षाकडून आणि त्यांच्या बापाकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? खरचं भटक्या विमुक्तांसाठी?
 
साता-याची भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, संस्थेचे अध्यक्षदेखील शरद पवारच...sharad pawar  भटक्या विमुक्तांच्या या संस्थेकडून दिला जाणारा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार दिला जातो निखिल वागळेंना. भटक्या विमुक्तांनी वागळेंना पुरस्कार देऊन काय साध्य करायचे आहे? भटक्या विमुक्तांमधले साहित्यिक आणि कवी संपलेत की काय? असतीलही कदाचित यांच्या नजरेत. पण त्याच भटक्या विमुक्तांच्या व्यथा मांडणा-या जवाहर राठोडांना का दिला नाही पुरस्कार? भटक्या विमुक्तांसाठी कार्य करणा-या या संस्थेने पुरस्कारही भटक्या विमुक्तांना देऊन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आघाडी सरकारने भटक्या विमुक्तांवर अन्यायकारक पद्धतीने sharad pawar लादलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सक्ती रद्द करण्याची मागणी या संस्थेने पवाराकडे करावी. पवारांनी ती तातडीने सोडवावी. भटके विमुक्त आधीच मागासलेले, कसेबसे शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कारण नसताना वेगवेगळे प्रमाणपत्र काढण्याच्या जाचक प्रक्रिया लादल्या गेल्यास, वैतागून शिक्षण सोडून पळतील, याची जाण ना देवाच्या बापाला आहे ना त्या भटक्या विमुक्तांच्या संस्थेला... केवळ उदाहरण देण्यापुरताच पुळका येतो...sharad pawar
 
९२७०३३३८८६