तेंदूपत्ता संकलनासाठी गेली अन्...

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

    दिनांक :14-May-2022
|
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
तेंदूपत्ता tendupatta गोळा करण्यासाठी गावाजवळील जंगलात गेलेल्या एका वृध्द महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवार, 14 मे रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली बफर क्षेत्रातील सीतारामपेठ गावाजवळ उघडकीस आली. जाईबाई महादेव जेंगठे (65, रा. मोहर्ली) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मोहर्ली येथील जाईबाई जेंगठे पहाटेच्या सुमारास ताडोबा बफर क्षेत्रातील सीतारामपेठ बीटातील कक्ष क्रमांक 956 मध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी गेली होती. तेंदूपत्ता वेचत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला.
 

tiger  
 
तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच मोहर्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी मून आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी भद्रावती येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतक महिलेच्या कुटूंबियांना tendupatta तात्काळ 50 हजार रूपयांची मदत देण्यात आली असून, सानुग्रह अनुदानाची उर्वरित रक्कम एका आठवड्यात देण्यात येणार असल्याने वनविभागाने कळविले आहे. महिलेला ठार केलेल्या वाघाचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून घटनास्थळी कॅमेरे लावण्यात आले आहे.