राष्ट्रभक्त योगींचा चमत्कार!

yogi aditynathविद्यार्थी राष्ट्रगीत गायनापासून वंचित

    दिनांक :14-May-2022
|
वेध
- अनिल फेकरीकर
yogi aditynath शाळा असो किंवा मदरसा तिथे प्रारंभी राष्ट्रगीत गायलाच हवे. मात्र, उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रगीतापेक्षा दुआ पठणावरच अधिक भर होता. त्यामुळे मदरशांमध्ये शिकणारी लाखो मुले राष्ट्रगीत म्हणण्यापासून वंचित होती. आता राष्ट्रगीतच म्हणणार नाही तर राष्ट्रभक्ती कशी जागृत होणार? अगदी हाच व्यापक दृष्टिकोन ठेवत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ yogi aditynath यांनी तेथील मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे बंधनकारक केले. हा निर्णय घेणा-या योगी आदित्यनाथ yogi aditynath यांचे मनापासून अभिनंदन! 
 
 
वेध f
 
पण एक प्रश्न पडतो की, आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली. तरीही मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायले जात नाही. राष्ट्रगीत म्हणण्यासाठी केवळ ५२ सेकंद लागतात. पण हे ५२ सेकंदही देण्यास मदरशांमधील लोकांना वेळ नाही, ही कसली देशभक्ती? वस्तुत: आपण ज्या देशात राहतो तेथील राष्ट्रगीत प्रत्येकाने म्हणायलाच हवे. yogi aditynath तीच खरी राष्ट्रभक्ती असते. मात्र, येथे राष्ट्रभक्तीपेक्षा धर्मभक्तीलाच राजकारण्यांनी प्राधान्य दिले. लोकही त्यांच्या मागे धर्मवेडे झाले. परिणामी त्यांचा विकासच झाला नाही. एक सांगतो, राष्ट्रगीत म्हणणा-यांच्या मनात स्वदेशाविषयी प्रीती उत्पन्न व्हावी, त्यास हुरूप यावा व हाती घेतलेले काम उत्साहाने सिद्धीस नेता यावे आणि प्रसंग कसाही बिकट आला तथापि धैर्य राहावे यासाठी राष्ट्रगीत असते.
 
yogi aditynath आपल्या देशात लोकशाही असल्याने त्याचा गैरफायदा घेणारेच भरपूर आहेत. मागे चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत गायनाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. त्यालाही काही लोकांनी लोकशाहीच्या नावाखाली विरोध केला. पण अखेर राष्ट्रभक्तांसमोर विरोधकांची डाळ शिजली नाही अन् चित्रपटापूर्वी राष्ट्रगीत गाणे सुरू झाले. yogi aditynath राष्ट्रगीत म्हटल्याने नेमके काय होते? तर ते गायल्याने मन प्रफुल्लित होते. देशाप्रती आदरभावना वाढते अन् हीच राष्ट्रभक्ती आपल्या देशाला एकसंध बनविण्यासाठी कारणीभूत ठरते. जगातील सर्वच देशांचे आपआपले राष्ट्रगीत आहे. नव्हे ते सुरू असताना सर्वच त्याचा सन्मान करतात. yogi aditynath मग मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायले जात नव्हते, याचा शोध यापूर्वी कुणीही घेण्याचा प्रयत्नच केला नाही. असो, प्रयत्न केलाही असेल किंवा त्यांना राजकारण करायचे असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असावे. आज योगी आदित्यनाथ यांनी धाडसी निर्णय घेत मदरशांमध्ये राष्ट्रगीत सुरू करावे याला मी चमत्कारच म्हणतो. याला काही मंडळी विरोध करतील.
 
तो त्यांनी करावा; मात्र जेव्हा केव्हा मदरशांमधील मुले हृदयापासून राष्ट्रगीत गातील आणि त्यांच्यात देशभक्ती जागृत होईल, त्या दिवशी या देशात हजारो डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम yogi aditynath तयार होतील. तीच व्यापक भूमिका मनात ठेवत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदरशांमध्ये राष्ट्रगीत सुरू केले असावे. ‘जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत आहे. कवी रवींद्रनाथ टागोर यांनी त्याची रचना केली. २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने त्याला राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. या गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे. भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणाèया नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. या गीताच्या माध्यमाने सर्वशक्तिमान श्री परमेश्वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.
 
yogi aditynath मग तरीही उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये शिकणारे विद्यार्थी राष्ट्रगीत गायनापासून वंचित राहावेत, ही बाब चांगली नाही. याचीच दखल योगी आदित्यनाथ यांनी घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैनिक जेव्हा शत्रूवर तुटून पडत त्यापूर्वी ते ‘हर हर महादेव' असा जयघोष करीत. yogi aditynath आजही भारतीय सैनिक शत्रूवर हल्ला करतात तेव्हा ‘भारत माता की जय' असे म्हणत समोर जातात. यामुळे त्यांच्यात जोश निर्माण होतो. रक्त सळसळते अन् शत्रूचा नायनाट करणे सोपे जाते. राष्ट्रगीताचेही तसेच आहे. ते गायल्याने मनात राष्ट्राविषयी आणि येथे राहणा-या लोकांबद्दल चांगले काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते. yogi aditynath त्याच बळावर मग अनेक चांगली कामे तडीस जातात. पुढे यथावकाश चांगले कार्य करणारा लोकांचे सुख पाहून सुखावतो. हीच गोष्ट राष्ट्रगीत गायनातून अभिप्रेत आहे. तेच कार्य योगी आदित्यनाथ यांनी करावे, हा प्रकार कौतुकास्पद म्हणावा लागेल.
९८८१७१७८५९