पुतिन यांच्या मुलीचा प्रियकर आहे झेलेन्स्क...नेमका घोळ काय?
दिनांक :20-May-2022
|
नवी दिल्ली,
एका वृत्तानुसार, व्लादिमीर पुतिन Putin's daughter यांची मुलगी कॅटरिना तिखोनोवाच्या प्रियकर झेलेन्स्की आहे. माहितीनुसार, तिच्या प्रियकराचे नाव युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासारखे आहे. युक्रेनवर हल्ला करण्याच्या पुतिन यांच्या निर्णयाचा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवरही परिणाम झाल्याचे या वृतांत म्हटले आहे. याचा परिणाम पुतिन यांच्या मुलीवरही झाला आहे, त्यामुळे कतरिना आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी मॉस्कोहून म्युनिकला जाऊ शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे