गरीब मराठे व ओबीसींनी मतदान करताना विचार करावा

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

    दिनांक :21-May-2022
|
तभा वृत्तसेवा
अमरावती,
राज्यातील श्रीमंत व Adv. Prakash Ambedkar विशेषत: सत्ताधारी मराठे गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी नकारात्मक आहे. राज्यकर्ते मराठे गरीब मराठ्यांनाच स्वीकारत नाही, मग ओबीसी तर त्यांच्या नात्यागोत्याचे किंवा रक्ताचेही नाही. त्यामुळे आता गरीब मराठे व ओबीसींनीही अशा राज्यकर्त्यांना मतदान करावे की नाही, याबाबत विचार केला पाहिजे, असे परखड मत वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर Adv. Prakash Ambedkar यांनी व्यक्त केले.
 
Adv. Prakash Ambedkar
 
पक्षाच्या शिबिराच्या अनुषंगाने अ‍ॅड. आंबेडकर शनिवारी अमरावतीच्या दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ते म्हणतात, राज्यघटनेप्रमाणे वागायचे नाही, असेच चित्र सध्या देशात आहे. राज्यघटनेनुसार लोकप्रतिनिधींच्या सभागृहाशिवाय प्रशासन कारभार करू शकत नाही; मात्र तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणुका आयोगाने वेळेवर घेतल्या नाही. सर्वोच्च न्यायालयानेही तत्काळ निवडणुका घ्या, असे स्पष्ट आदेश दिले नाही. घटनेच्या चौकटीला ते धरून नाही, असे त्यांनी Adv. Prakash Ambedkar स्पष्ट केले.
 
 
खरंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ज्या प्रमाणे या देशात मंदिर, मशीद किंवा कुठलीही इमारत होती ती तशीच पुढे जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र, चारशे वर्षांपूर्वी याठिकाणी असं होतं, असे विषय सुरू करण्यात कुठलाही अर्थ नाही. असेच जर करायचे असेल तर उद्या जगाने आपल्याला अशोकाच्या काळात भारतात काय होते असे विचारले तर अशोकाच्या काळात असणारा भारत आता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार का? खरंतर हे सर्व अशक्य आहे आणि अशा चुकीच्या विषयांकडे समाजाला वळविणे योग्य नाही. जुने वाद उकरून काढण्यासाठी केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्था नाही. न्यायव्यवस्थेने आणि केंद्राने आपल्या मर्यादेत राहावे, असा इशारा देखील अ‍ॅड. आंबेडकर Adv. Prakash Ambedkar यांनी दिला.
 
 
शरद पवारांनी उत्तर द्यावे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य केले आणि यातच अभिनेत्री केतकी चितळीच्या प्रकरणाने भर टाकली. आता आपण ब्राह्मणविरोधी नाही हे सिद्ध करण्यासाठी शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाची बैठक बोलावली. या बैठकीवर काहीजणांनी बहिष्कार का घातला याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे, असे देखील Adv. Prakash Ambedkar प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
 
...तर अशांतता निर्माण होणार
केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्था या मर्यादेच्या बाहेर गेल्या तर या देशात अशांतता निर्माण होण्याची भीती Adv. Prakash Ambedkar प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. काश्मीर मधल्या साडे तीन जिल्ह्यांमध्ये मध्ये 1980 पासून ते 2022 पर्यंत जे काही सुरू आहे त्यामुळे अख्ख्या देशात अशांतता निर्माण झाली आहे. गंभीर बाब म्हणजे देशाचे पाच लाख सैन्य काश्मीर आपल्या ताब्यात घेऊ शकले नाही. बलाढ्य रशियाचे उदाहरण सर्वांसमोर आहे. आपल्याला देशात शांतता हवी आहे की, अशांतता हवी आहे याबाबत देशातील नागरिकांनी ठरवावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश गवई, प्रा. निशा शेंडे आदी उपस्थित होते.