चेन्नईयन एफसीच्या अनिरुद्ध थापाला करारवाढ

    दिनांक :21-May-2022
|
चेन्नई ,
दोन वेळा इंडियन सुपर लीग फुटबॉल चॅम्पियन चेन्नईयन एफसीने भारताच्या मध्य फळीचा खेळाडू Aniruddha Thapa अनिरुद्ध थापाचा करार दोन वर्षांसाठी वाढविला आहे. करारानंतर 24 वर्षीय थापा 2024 पर्यंत क्लबसोबत असणार आहे. थापा 2016 सालापासून क्लबशी जुळलेला आहे. चेन्नईयन एफसीमध्ये ससभागी झाल्यापासून डेहराडूनमध्ये जन्मलेला Aniruddha Thapa अनिरुद्ध फुटबॉल संघाचा अविभाज्य भाग आहे. चेन्नईयीनच्या यशात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे.
 
 
ANIRUDDHA-THAPA
 
Aniruddha Thapa तो दोन वेळा इंडियन सुपर लीगच्या अंतिम सामन्यात खेळलेल्या संघाचा एक भाग आहे. 2017-18 मध्ये त्याचा सहभाग असलेल्या चेन्नईयन एफसी संघाने इंडियन सुपर लीगचे विजेतेपद पटकावले आहे. एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत ब गटाच्या सामन्यात अली माबखोतने पेनॉल्टीवर केलेल्या गोलमुळे मुंबई सिटीला अल जझिराकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला. तीन सामन्यांतून मुंबईचा हा दुसरा पराभव ठरला. त्याला पहिल्या सामन्यात मुंबई सिटीला अल शाबादकडून पराभव स्वीकारावा लागला होता.