अकरावी प्रवेशाचे अर्ज 30 मेपासून

    दिनांक :21-May-2022
|
मुंबई, 
दहावीचा निकाल जूनमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पृष्ठभूमीवर दहावीत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना Eleventh entry अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी धावपळ होऊ नये, यासाठी शिक्षण संचालनालयाकडून 30 मेपासून ऑनलाईन नाव नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रकि‘येला सुरुवात करण्यात येणार आहे. राज्यातील Eleventh entry अकरावी प्रवेशासाठी मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहेत.
 
 
Eleventh entry
 
यात विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करून Eleventh entry प्रवेश अर्जाचा भाग 1 भरणे, ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करणे, मार्गदर्शन केंद्र निवडणे, अर्जामध्ये दुरुस्ती करून घेणे या गोष्टी करता येणार आहेत. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग विद्यार्थ्यांना भरायचा आहे. दुसर्‍या भागात नियमित किंवा कोट्यांतर्गत पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करायची आहे. त्यामुळे अर्जाचा भाग 1 भरल्यानंतर त्यात दुरुस्ती करणे व पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळणार आहे.