शिवलिंगासंबंधी वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक आणि सुटका

    दिनांक :21-May-2022
|
-द्वेषभावना पसरवल्याचा आरोप
 
वाराणसी, 
Gyanvapi ग्यानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा केल्यानंतर दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक रतन लाल यांनी समाज माध्यमात वादग्रस्त वक्तव्य अर्थात् पोस्ट प्रकाशित केल्याने त्यांना शुक‘वारी रात्री अटक करण्यात आली. दरम्यान, आज दुपारी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या जामिनावर सुटका करण्यात आली. हिंदू महाविद्यालयातील प्राध्यापक रतन लाल यांनी Gyanvapi ग्यानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाचे वादग्रस्त छायाचित्र समाज माध्यमात प्रकाशित करीत वादग्रस्त वक्तव्य केले होते.
 
gyanvapi 21
 
 
Gyanvapi : हिंदूंच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाविरोधात एका वकिलाने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून शुक‘वारी रात्री उशिरा रतन लाल यांना अटक करण्यात आली. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी निदर्शनेही केली होती. त्यांच्यावर भादंवि कलम 153ए (धर्म, जात, जन्मस्थान, निवास, भाषा आदिच्या आधारावर विविध समुदायात द्वेषभावना पसरवणेे) आणि 295ए (धर्माचा अपमान करून जाणीवपूर्वक धार्मिक भावना भडकावणे ) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, आज दिल्लीतील एका न्यायालयाने त्यांची जामिनावर त्यांची केली असल्याचे सूत्राने सांगितले. सदर प्रकरणात वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांची बदली केली आहे.