हिंदु एकता दिंडीने स्फुल्लिंग चेतवले

शहरात ठिकठिकाणी जोरदार स्वागत

    दिनांक :21-May-2022
|
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
सनातन संस्थेचे Hindu Ekta Dindi संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या 80 व्या जन्मोत्सवानिमित्त समस्त हिंदुत्वनिष्ठ बांधवांकडून शनिवारी सांयकाळी काढण्यात आलेल्या भव्य हिंदु एकता दिंडीने Hindu Ekta Dindi अमरावती शहरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचचे स्फुल्लिंग चेतवले.
 
Hindu Ekta Dindi
 
श्री एकवीरा देवी मंदिरामागील प्रांगणातून शंखनाद, धर्मध्वजाचे पूजन आणि पालखी पूजन करून दिंडीला Hindu Ekta Dindi प्रारंभ झाला. पुढे, शहरातील मुख्य भागातून नगर प्रदक्षिणा करून गोपाळकृष्ण मंदिर अंबापेठ येथे दिंडीची सांगता झाली. डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ, आध्यात्मिक संघटना आणि त्यांचे पथक, भजनी मंडळे, वारकरी, शिवकालीन मर्दानी पथक, तुळस आणि कळस घेतलेल्या महिलांचे पथक, डॉ. आठवले आणि श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवी यांची प्रतिमा असलेली पालखी, रणरागिणी पथक, समाजप्रबोधन पर घोषवाक्य असलेल्या छत्रीचे पथक, प्रथमोपचार पथक इत्यादी विविध पथकांनी दिंडीची शोभा वाढवली. राष्ट्रपुरूषांच्या पोषाखामधील बालसाधक हे विशेष आकर्षण ठरले. ’हिंदू एकता दिंडीला’ शहरातील जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला. अमरावती शहर अक्षरशः भगवेमय झाले होते. अनेक ठिकाणी धर्मध्वजाचे पूजन तसेच राजकमल चौकात दिंडीवर Hindu Ekta Dindi पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.