मुंबई,
रविवारी येथे पंधराव्या आयपीएल हंगामाचा शेवटचा साखळी सामना सनरायझर्स Hyderabad-Punjab हैदराबाद व पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघांच्या प्ले-ऑफच्या आशा धुळीस मिळाल्यामुळे आता हा सामना औपचारिक असला तरी दोन्ही संघ हंगामाचा शेवट विजयाने करण्यास उत्सुक असतील. गुरुवारी रॉयव चॅलेंजर्स बंगळुरूने गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरात टायटन्सचा पराभव केल्याने दोन्ही संघ प्ले-ऑफ शर्यतीतून बाद झालेत. हा सामना हैदराबाद सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यम्सनच्या अनुपस्थितीत खेळल्या जाणार आहे. विल्यम्सन आपल्या दुसर्या मुलाच्या जन्मासाठी न्यूझीलंडला परतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार किंवा निकोलस पूरन सनरायझर्सचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. भुवनेश्वरने याआधी संघाचे नेतृत्व केले आहे. Hyderabad-Punjab हैदराबादने गत सामन्यात मुंबई इंडियन्सवर तीन धावांनी विजय मिळविला, तर तर पंजाबला दिल्ली कॅपिटल्सकडून 17 धावांनी पराभव पत्करावा लागला.
Hyderabad-Punjab मयंक अग‘वाल व कंपनी सलग दोन सामने जिंकू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. संपूर्ण हंगामात पंजाब किंग्सच्या कामगिरीत सातत्य नव्हते. बंगळुरूला 54 धावांनी पराभूत केल्यानंतर उत्साही पंजाब किंग्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक असताना त्यांची फलंदाजी कोसळली. आता हैदराबादविरुद्ध जिंकण्यासाठी पंजाबच्या फलंदाजांना जबरदस्त फलंदाजी करणे आवश्यक आहे. पंजाबकडे कर्णधार मयंक अग‘वालसह जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, शिखर धवन व जितेश शर्मासारखे खंदे फलंदाज आहे. गोलंदाजी विभागात आघाडीचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा (22 बळी) असून तो या हंगामात वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. दक्षिण आफि‘केच्या रबाडाने 8.36 च्या इकॉनॉमीसह 16.72 च्या सरासरीने गोलंदाजी केली आहे.
अर्शदीप सिंगने आपल्या यॉर्करने अनेकांना प्रभावित केले आहे.
Hyderabad-Punjab दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने सलग पाच सामने जिंकले आणि अव्वल दोन क‘मांकाच्या दिशेने वाटचाल केली, परंतु त्यांचे आघाडीचे गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर व टी. नटराजनला झालेल्या दुखापतीमुळे त्यांची मोहीम थंडावली. ते पाच सामन्यांतील पराभवामुळे क‘मवारीत घसरले. कर्णधार विल्यम्सनचा वाईट फॉर्मसुद्धा संघाला मदत करू शकला नाही. गोलंदाजी विभागात वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांच्या प्रभावी मार्याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण त्याने गत सामन्यांमध्ये चांगली खेळी केली होती. हैदराबादला मध्यमगती गोलंदाज फजलहक फारुकीच्या रूपात अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाजही सापडला. त्याने गत सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. भुवनेश्वर व फारुकी पुन्हा चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. फलंदाजीची भिस्त राहुल त्रिपाठी, अभिषेक वर्मा व मार्करामवर असेल.