2024 मध्ये पंतप्रधापदी मोदीच!

    दिनांक :21-May-2022
|
- आयएएनएस-सी व्होटर सर्व्हेतून लोकांची पसंती
 
नवी दिल्ली, 
भाजपाने आणि देशातील सर्वच राजकीय पक्षांनी 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, एका IANS-C सर्व्हेमधून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी लोकांची अजूनही पसंती असल्याचे समोर आले आहे. देशातील आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेशात IANS-C आयएएनएस-सी व्होटर कडून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
 
 
modidsa;
 
IANS-C आयएएनएस-सी व्होटरकडून केलेल्या चार राज्यातील सर्वेक्षणात पंतप्रधानपदासाठी लोकांनी नरेंद्र मोदींना पसंती दिल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या राज्यात 2021 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या राज्यातील लोकांनी अजूनही पंतप्रधापदासाठी मोदींना पसंती दिली असून, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल या सर्वेक्षणातील यादीत खाली आहेत. या सर्वेक्षणात आसाममधील 43 टक्के जनतेने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. 11.62 टक्के लोकांनी केजरीवाल आणि 10.70 टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे. केरळमध्ये राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलाण तिथे 28 टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला आहे; तर 20.38 टक्के लोकांनी राहुल गांधी यांना आणि 8.28 टक्के लोकांनी केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे.
 
 
IANS-C तामिळनाडूमध्ये 29.56 टक्के लोकांनी मोदींना समर्थन दिले आहे तर, राहुल गाधींना 24.65 टक्के आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना 5.23 टक्के लोकांनी पाठिंबा दिला असून, या यादीत त्या तिसर्‍या स्थानावर आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्येही 42 टक्के लोक मोदींना पसंती देत आहेत. त्यानंतर ममता बॅनर्जी यांना 26 टक्के लोकांनी पसंती दिली. राहुल गांधी यांना पश्चिम बंगालमध्ये 14 टक्के लोकांनी पाठिंबा दिल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.