कंगना राणावतचा ‘धाकड’ चित्रपट झाला ऑनलाईन लिक

    दिनांक :21-May-2022
|
मुंबई,
अभिनेत्री कंगना राणावतच्या Kangana Ranaut ‘धाकड’ चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. हा चित्रपट शुक‘वारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे.
 
Kangana Ranaut
 
चित्रपट लीक झाल्यामुळे Kangana Ranaut निर्मात्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनाच या बातमीने जोरदार धक्का बसला आहे. हा चित्रपट एचडी प्रिंटमध्ये अनेक वेबसाईटवरून लीक झाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायाला फटका बसेल, असा धोका सगळीकडून व्यक्त केला जात आहे, कारण लोक हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्याऐवजी ऑनलाईन डाऊनलोड करून पाहण्यास सुरुवात करतील.