मलिकांचे डी गँगशी कनेक्शन...न्यायालयाने केले मान्य

    दिनांक :21-May-2022
|
मुंबई, 
काही दिवसांपूर्वी ईडीने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक Malik यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडची जमीन घेण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मलिक यांनी हसिना पारकर, सरदार शाहवली खान यांच्याशी भेटी घेतल्याचा आरोप ईडीने केला आहे. मलिक यांनी दाऊद टोळीशी संबंध ठेवून गोवावाला कंपाउंडची जागा मिळवली होती. आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीशी त्याचे संबंध असल्याचा मुद्दा न्यायालयानेही मान्य केला आहे.
 
 
malik
 
हसीना पारकर यांच्यासोबत त्यांनी अनेकवेळा भेटी घेतल्या आणि मनी लाँड्रिंगही केले. या न्यायालयीन कारवाईनंतर मलिक Malik यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सलीम पटेल, हसिना पारकर, सरदार शाहवली खान यांच्या संपर्कात असल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान  नवाब मलिक किडनीच्या समस्येने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी कुर्ल्यातील रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते.