ग्वांगजू (दक्षिण कोरिया),
भारतीय Men's compound पुरुष कम्पाऊंड तिरंदाजी संघाने शनिवारी दुसर्या चरणाच्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत फ्रान्सवर दोन गुणांनी मात करीत सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले. प्रथम चरणाच्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेतील अंतिम सामन्याची पुनरावृत्ती करताना अभिषेक वर्मा, अमन सैनी व रजत चौहानचा समावेश असलेला चौथा मानांकित भारतीय Men's compound पुरुष संघाने सहाव्या मानांकित फ्रान्सवर वर्चस्व गाजविले.
Men's compound भारतीय त्रिकुटांनी अचूक लक्ष्य साधत अॅड्रियन गोंटियर, जीन फिलिप बौल्च व क्वेंटिन बरेरचा समावेश असलेल्या फ्रान्स संघावर 232-230 असा विजय मिळवून विश्वचषकात दुसरे सुवर्णपदक जिंकले. एप्रिलमध्ये अंतल्या येथे झालेल्या गत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय त्रिकुटाने फ्रान्सचा एका गुणाने पराभव केला होता. मिश्र सांघिक स्पर्धेत अभिषेक वर्माने अवनीत कौरच्या साथीने उच्च मानांकित तुर्कीच्या अमिरकान हॅनी व आयसे बेरा सुझर या जोडीला 156-155 अशा एका गुणाच्या फरकाने पराभूत करून कांस्यपदक मिळविले. हे त्यांचे दुसरे पदक ठरले. अवनीत कौरचे महिलांच्या सांघिक स्पर्धेतील कांस्यपदकानंतर हे दुसरे कांस्य आहे.