मोंजोलिकाची बॉक्स ऑफिसवर जादू

    दिनांक :21-May-2022
|
मुंबई,
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा Monjolika magic  ‘भूल भूलैय्या 2’ नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत जवळपास 14.75 कोटींची कमाई केली. हा चित्रपट देशभरातील 3,200 पेक्षा जास्त स्क‘ीन्सवर प्रदर्शित करण्यात आला, अशी माहिती ट्रेड अ‍ॅनॅलिस्ट कोमल नहाता यांनी दिली.
 
Monjolika magic
 
राजस्थानच्या एका कुटुंबातील मोंजोलिकाची गोष्ट या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया’ चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. या Monjolika magic  चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, अमिशा पटेल, विद्या बालन आणि शायनी आहूजा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तर या चित्रपटाच्या दुसर्‍या भागात कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.