पुन्हा ऑनर किलिंग...युवकाची चाकूने वार करून हत्या

    दिनांक :21-May-2022
|
हैदराबाद,
हैदराबादमधून एक Murder हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. दुसर्‍या जातीत लग्न केल्याच्या कारणावरून हैदराबादमध्ये एका तरुणाची भर रस्त्यात भोसकून हत्या करण्यात आली. येथील बेगम बाजार येथे शुक्रवारी रात्री पाच जणांनी दुसऱ्या जातीतील महिलेशी लग्न करणाऱ्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या केली. त्याने सांगितले की, नीरजने गेल्या वर्षी संजना नावाच्या मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता
 
 
kilg
 
गोशामहलचे एसीपी सतीश कुमार यांनी सांगितले की, नीरजवर चार अज्ञातांनी चाकूने वार केले. या घटनेत नीरज गंभीर जखमी झाला. त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी सखोल शोधमोहीम राबविण्यात येत आहे. एसीपी सतीश कुमार यांनी सांगितले की, नीरजने संजना नावाच्या मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळेच नीरजवर हल्ला Murder झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेत मुलीच्या कुटुंबीयांचा हात असल्याचा संशय आहे. त्याचा शोध सुरू आहे.