एनएसई घोटाळा प्रकरणी सीबीआयची छापेमारी

    दिनांक :21-May-2022
|
नवी दिल्ली, 
NSE scam एनएसई घोटाळा प्रकरणात सीबीआयने आज शनिवारी विविध शहरांमध्ये 10 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापेमारी केली. मुंबई, गांधीनगर, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, कोलकाता आणि इतर शहरांतील दलालांच्या 12 पेक्षा जास्त ठिकाणांवर ही छापेमारी केली असे अधिकार्‍याने सांगितले.
 
 
cbi dksl
 
या प्रकरणी NSE scam एनएसईच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण आणि समूह कार्यपालन अधिकारी आनंद सुब्रमण्यन् यांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. चित्रा रामकृष्ण एनएसईचे कामकाज सांभाळत असताना 2010 ते 2015 पर्यंत एफआयआरमधील आरोपी असलेल्या ओपीजी सिक्युरिटीजने ‘फ्युचर्स अ‍ॅण्ड ऑप्शन्स’मध्ये 670 कामकाजी दिवसांत दुय्यम पीओपी सर्व्हरशी जोडणी केली होती.
 
 
NSE scam एनएसईच्या अधिकार्‍यांनी काही दलालांना दिलेले प्राधान्य आणि रामकृष्ण आणि सुब‘मण्यन् यांच्या कार्यकाळात त्यातून मिळालेल्या अवाजवी नफ्याबद्दल चौकशी सीबीआयने खुली ठेवली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण यांची 2013 मध्ये जागा घेण्यार्‍या रामकृष्णा यांनी सुब्रमण्यन् यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले. त्यानंतर त्यांना 4.21 कोटी रुपयांच्या मोठ्या वार्षिक वेतनावर समूह कार्यपालन अधिकारीपदी बढती देण्यात आली, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.