पेट्रोल 9.50, डिझेल 7 रुपयांनी होणार स्वस्त

    दिनांक :21-May-2022
|
- केंद्र सरकारचा सामान्य नागरिकांना दिलासा
- उज्ज्वला योजनेतील सिलेंडरला 200 रुपयांचे अनुदान
 
नवी दिल्ली, 
कोरोना महामारी, रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे निर्माण झालेली स्थिती आणि वाढत्या महागाईत पोळणार्‍या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा केंद्र सरकारने आज शनिवारी दिला आहे. केंद्र सरकारने आज पेट्रोलवरील अबकारी कर प्रती लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील कर 6 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman निर्मला सीतारामन् यांनी केली. यामुळे पेट्रोल प्रती लिटरमागे 9.50 तर, डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रती लिटर 8 रुपयांनी आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली, असे अर्थमंत्री Nirmala Sitharaman सीतारामन् यांनी सांगितले. यामुळे महसुलात वर्षाला सुमारे एक लाख कोटी रुपयांचा तोटा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
 
petrol dizal
 
राज्यांना आवाहन
राज्यांनीही अशाच प्रकारची कपात करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन सीतारामन् यांनी केले आहे. मी सर्वच राज्यांना, विशेषतः नोव्हेंबर 2021 मध्ये इंधनात कपात न करणार्‍या राज्यांना विनंती करू इच्छिते की, त्यांनी अशीच कपात करून सामान्यांना दिलासा द्यावा, असे Nirmala Sitharaman सीतारामन् यांनी सांगितले.
गॅस सिलेंडरवर 200 रुपयांचे अनुदान
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना सरकार प्रती गॅस सिलेंडर (12 सिलेंडरपर्यंत) 200 रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा Nirmala Sitharaman निर्मला सीतारामन् यांनी यावेळी केली.
शेतकर्‍यांना पुन्हा दिला मोठा दिलासा
जगभरात खतांच्या किमती वाढत असताना, आम्ही देशातील शेतकर्‍यांचे अशा दरवाढीपासून संरक्षण केले आहे. अर्थसंकल्पात 1.05 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाव्यतिरिक्त 1.10 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम आपल्या शेतकर्‍यांना आणखी दिलासा म्हणून दिली जात आहे, असे Nirmala Sitharaman सीतारामन् यांनी सांगितले.
कच्च्या मालावरील अबकारी करातही कपात
केंद्र सरकार कच्च्या मालावरील अबकारी करातही कपात करीत आहे सोबतच प्लॅस्टिक उत्पादन, जिथे भारत फार जास्त प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे, त्यावरील आयातीत दिलासा देण्याचा आमचा विचार आहे. पोलादाच्या काही कच्च्या मालावरील आयातशुल्क कमी केले जात आहे तसेच निर्यांत केल्या जाणार्‍या काही पोलादी उत्पादनांवर निर्यातशुल्क आकारले जाईल, अशी माहिती Nirmala Sitharaman सीतारामन् यांनी दिली.