उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणात ओमप्रकाश चौटाला दोषी

    दिनांक :21-May-2022
|
-दिल्लीतील न्यायालयाचा निर्णय
 
नवी दिल्ली, 
उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणात येथील न्यायालयाने हरयाणाचे माजी मुख्यमंत्री Omprakash Chautala ओमप्रकाश चौटाला यांना आज शनिवारी दोषी ठरवले आहे. विशेष न्यायाधीश विकास ढल यांनी हा निर्णय दिला. त्यांच्या शिक्षेवर 26 मे रोजी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर न्यायालय त्यांच्या शिक्षेबाबत निर्णय घेईल. या युक्तिवादादरम्यान Omprakash Chautala ओमप्रकाश चौटाला न्यायालयाक हजर राहतील. या प्रकरणी 19 मे रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान या प्रकरणी न्यायालयाने निर्णय सुरक्षित ठेवला होता.
 
 
Omprakash Chautala
 
जेबीटी घोटाळ्यात न्यायालयाने Omprakash Chautala चौटाला यांना यापूर्वीच दोषी ठरवले आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांना सात वर्षांची तर कट रचल्याचा आरोप सिद्ध झाल्याने दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा भोगल्यानंतर Omprakash Chautala ओमप्रकाश चौटाला यांची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली होती.