सिंधूचे आव्हान संपुष्टात

    दिनांक :21-May-2022
|
- थायलंड ओपन बॅडमिंटन

बँकॉक, 
थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू P. V. Sindhu पी. व्ही. सिंधू हिचे आव्हान संपुष्टात आले. शनिवारी येथे उपांत्य सामन्यात सिंधूला ऑलिम्पिक विजेती चेन यू फेईकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. दोन वेळा ऑलिम्पिकपदक विजेत्या सिंधूला तिसर्‍या मानांकित चेनकडून 43 मिनिटांत 17-21, 16-21 असा पराभव स्विकारावा लागला. सहावी मानांकित P. V. Sindhu सिंधू या सामन्यात नेहमीसारखी आक‘मक नव्हती, परंतु चीनच्या खेळाडूने आपल्या ठेवणीतले फटके मारीत सिंधूवर वर्चस्व गाजविले. 2019 च्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरअंतिम सामन्यात हैदराबादची 26 वर्षीय सिंधू चेनकडून पराभूत झाली होती.
 
 
PV-SINDHU
 
सामन्याच्या प्रारंभी 3-3 अशा बरोबरीनंतर पहिल्या गेममधील मध्यंतरापर्यंत 7-11 अशी पिछाडीवर होती. त्यानंतर चेनने रॅलींवर वर्चस्व राखले व अखेर पाच गेम पॉइंट्स घेत पहिला गेम जिंकला. दुसर्‍या गेममध्ये मात्र P. V. Sindhu सिंधूने 6-3 अशी आघाडी घेतली, परंतु चौथी विश्वमानांकित चेनने लवकरच सामन्यात पुनरागमन केले व पुढे 15-12 अशी आघाडी घेत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. अखेर चेनने चार मॅचपॉइंट मिळवले व सामना जिंकला. सिंधूला तिचा आक‘मक खेळ थांबवता आला नाही. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय व स्विस ओपनमध्ये या हंगामात दोन सुपर 300 विजेतेपदे जिंकणारी P. V. Sindhu पी. व्ही. सिंधू पुढील 7 ते 12 जून दरम्यान जकार्ता येथे होणार्‍या इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेणार आहे.