पाकिस्तानी एजंटला माहिती देणार्‍या जवानाला अटक

    दिनांक :21-May-2022
|
-मधुजाळ्यात अडकला
 
जयपूर, 
एका Pakistani agents पाकिस्तानी महिला एजंटला सैन्यदलाची गोपनीय आणि धोरणात्मक माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली लष्कराच्या एका जवानाला अटक करण्यात आली, अशी माहिती एका गुप्तचर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. प्रदीपकुमार असे अटक केलेल्या जवानाचे नाव असून, तो जोधपूर येथे गनर या पदावर आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एका Pakistani agents महिला एजंटसोबत तो संपर्कात होता. त्याचावर काही दिवस नजर ठेवण्यात आली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
 
 
atta
 
प्रदीपकुमार फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून Pakistani agents पाकिस्तानी महिला एजंटच्या संपर्कात होता आणि संवेदनशील माहिती तिला पुरवत होता, असे त्याच्यावर नजर ठेवली असताना दिसून आले. चौकशीसाठी त्याला 18 मे रोजी ताब्यात घेण्यात आले व त्यानंतर अटक करण्यात आली. तो मूळचा उत्तराखंड येथील असून, तीन वर्षांपूर्वी लष्करात दाखल झाला. सहा महिन्यांपूर्वी त्याला मोबाईलवर एका महिलेचा कॉल आला होता. मी बंगळुरू येथे लष्करी परिचारिका असल्याची ओळख या महिलेने दिली होती. दिल्ली येथे झालेल्या भेटीदरम्यान तिने प्रदीपकुमारला जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याच्याकडून लष्कराची संवेदनशील माहिती घेणे सुरू केले, असे अधिकार्‍यांनी सांगितले.