विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकरांचे नाव निश्चित

    दिनांक :21-May-2022
|
- इतर तीन जागांसाठी इच्छुकांच्या हालचाली
 
मुंबई, 
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांची धावपळ सुरू असताना, विधान परिषदेसाठी आता भाजपातील इच्छुकांनी हालचाली व लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. विधान परिषदेवर भाजपाचे चार सदस्य सहज निवडून जाणार असल्याने या चार जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. मात्र, Praveen Darekar प्रवीण दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. विधान परिषदेवर जाण्यासाठी भाजपामध्ये बर्‍याच जणांनी लॉबिंग सुरू असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पुन्हा संधी मिळू शकते. प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांच्यापैकी कुणाला तरी एकाला पुन्हा विधान परिषदेची संधी मिळू शकते.
 
 
Praveen Darekar
 
Praveen Darekar प्रवीण दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना माजी मंत्री पंकजा मुंडे, चित्रा वाघ, अनिल बोंडे, राम शिंदे, कृपाशंकर सिंह यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजपाच्या वरिष्ठांकडून चार जागांसाठी कुणाला संधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या वेळी शिवसंग्रामचे विनायक मेटे, सुरजितसिंह ठाकूर यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.
 
 
असे आहे जागांचे गणित
विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर, 27 मतांची आवश्यकता आहे. भाजपा आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहे. त्यामुळे भाजपाच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. या चार जागांसाठी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.

भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवणार?
महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता, राज्यसभेसाठी भाजपा तिसरी जागा लढण्याची शक्यता असल्याचा माहिती सूत्रांनी दिली. भाजपाकडे सध्या 113 आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपाचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष पाच आमदार असे एकूण 113 आमदार भाजपाकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे. भाजपाला फक्त 13 मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार भाजपा दोन, शिवसेना काँग्रेस आणि राकाँचा एक उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून जाऊ शकतो.