रतन इंडियात जाणारी पाईपलाईन फुटली

लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

    दिनांक :21-May-2022
|
तभा वृत्तसेवा
शिरखेड,
सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणामधून Ratan India रतन इंडिया पॉवर प्लांट येथे वीज निर्मितीकरिता पाण्याची पाईपलाईन गेली असून लेहेगाव चौकीवर पाच दिवसापासून ही पाईपलाईन फुटलेली असून दररोज कितीतरी लिटर पाणी वाहत आहे. संबंधित अधिकारी कुंभकर्णी झोपेत दिसत आहे.

Ratan India 
 
अमरावती जिल्ह्यात 45 सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असून उन्हाळ्यातील Ratan India तापमान अधिक वाढल्यास पाण्याच्या पातळीत मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात तथा अमरावती शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व एमआयडीसी येथे सुद्धा पाणी पुरवठा केला जातो. अप्पर वर्धा धरणातून मुबलक पाणीसाठा जमा होत असल्याने अमरावती शहराला वर्षभरही पाणीटंचाई भासत नाही. या धरणातून शेतीसह औद्योगिक क्षेत्रात सुद्धा पाणीपुरवठा केला जातो. पावसाळा भरपूर प्रमाणात झाला तरी उन्हाच्या तापमानामुळे धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत असून सुद्धा Ratan India पॉवर प्लांटचे अधिकारी आंधळेपणाची भूमिका बजावत आहे.
 
 
सध्या उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. या विक्रमी उन्हामुळे Ratan India पाण्याचा वापरही तेवढ्याच पटीने वाढला आहे. अशा परिस्थितीत प्लांटला होणार्‍या पाणी पुरवठ्याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी अनेक गावांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागले होते. मात्र दरम्यानच्या काळात या गंभीर बाबीवर लक्ष देण्यात आल्याने या भागातील पाणीटंचाई कमी झालेली आहे. मात्र काही गावात पाणीटंचाई सुरूच आहे. त्यामुळे गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. येथे पॉवर प्लांटच्या पाईपलाईनचे पाणी इतरत्र वाहत जाऊन नाल्यात येत आहे. एकीकडे शहराला पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन दिवसाआड प्रतीक्षा करावी लागते तर दुसरीकडे वीज निर्मितीकरिता आवश्यक पाणी पाच दिवसापासून वाहून जात असल्यामुळे डवरगाव येथील पॉवर प्लांटचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. धरणातील Ratan India पाण्याचा अपव्यय होत असून हा अपव्यय थांबविण्याची मागणी जनतेकडून होत आहे.