होय, भारतीय परराष्ट्र सेवा बदलली

    दिनांक :21-May-2022
|
- जयशंकर यांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर
 
नवी दिल्ली, 
भारतीय परराष्ट्र सेवा पूर्णपणे बदलली आहे आणि ही उन्मत्त झाली, असे एका युरोपियन नोकरशहाचा हवाला देत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याला परराष्ट्र व्यवहार मंत्री S. Jaishankar एस. जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. होय, भारतीय परराष्ट्र सेवा बदलली आहे. याला राष्ट्रीय हिताचे संरक्षण करणे म्हणतात, असे त्यांनी सांगितले.
 
 
S. Jaishankar
 
भारतीय परराष्ट्र सेवेत झालेल्या या बदलातून यातील अधिकार्‍यांचा आत्मविश्वास दिसून येतो, असे S. Jaishankar जयशंकर यांनी ट्विटवर राहुल गांधींवर हल्ला चढवताना म्हटले. परराष्ट्र सेवा सरकारच्या आदेशाचे पालन करते. इतराच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देते. याला उन्मत्तपणा नव्हे तर, आत्मविश्वास म्हणतात आणि या माध्यमातून राष्ट्रहित जपले जाते, असे S. Jaishankar जयशंकर यांनी म्हटले आहे.