धवन किमान आणखी तीन वर्षे खेळू इच्छितो

    दिनांक :21-May-2022
|
मुंबई, 
सलामीवीर Shikhar Dhawan शिखर धवन वन-डे कि‘केटचा अविभाज्य भाग आहे, परंतु त्याला वाटते की त्याला अजूनही टी-20 कि‘केटमध्ये अजून खूप कामगिरी करणे शिल्लक आहे. त्यामुळेच तो किमान आणखी तीन वर्षे सर्वोच्च स्तरावर खेळू इच्छित आहे. दिल्लीच्या 36 वर्षीय धवनने आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण धावा काढल्या आहे. त्याने पंजाब किंग्ससाठी एक सामना शिल्लक असताना 421 धावा केल्या आहेत. गत आयपीएलमध्ये या शैलीदार सलामीवीराने 300 पेक्षा कमी धावा केल्या होत्या. तथापि, गत वर्षी श्रीलंका दौर्‍यात भारतीय संघाचे नेतृत्व करीत धावा काढल्या, परंतु त्याला टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही.
 
 
SHIKHAR-DHAWAN 21
 
भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे, परंतु Shikhar Dhawan धवन 9 जूनपासून दक्षिण आफि‘केविरुद्धच्या मायभूमीवरील मालिकेसह टी-20 कि‘केटमध्ये पुनरागमन करण्याची अपेक्षा बाळगून आहे. मी वन-डे संघाचा अविभाज्य भाग असलो तरी, मला अजूनही वाटते की माझ्या अनुभवामुळे मी टी-20 कि‘केटमध्ये योगदान देऊ शकतो. मी टी-20 मध्ये चांगली कामगिरी करीत आहे. मला जी काही जबाबदारी दिली, ती उत्तमरित्या पार पडली आहे, असे तो म्हणाला.
 
 
मी खेळत असलेल्या क्रिकेट प्रकारात सातत्य राखण्यात यशस्वी झालो आहे, मग ते आयपीएल असो किंवा देशांतर्गत स्तरावरील सामने असो. मी खेळाचा आनंद घेत आहे. सातत्य म्हणजे केवळ अर्धशतके किंवा शतके वारंवार ठोकणे नव्हे, तर अशा प्रकारांमधील धावांचे अंतर राखणेसुद्धा आहे, असे Shikhar Dhawan धवन म्हणाला. गतवर्षी श्रीलंका दौर्‍यात मी संघाचे नेतृत्व केले. त्यामुळे संघनेतृत्व करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. मात्र टी-20 विश्वचषकाला मुकल्याने साहजिकच निराश झाला होतो, पण मी खूप सकारात्मक व्यक्ती आहे. कदाचित टी-20 विश्वचषकासाठी निवडलेले खेळाडू माझ्यापेक्षा चांगले व योग्य वाटले असावे. निवडकर्त्यांच्या निर्णयाचा मी आदर करतो. आयुष्यात असे घडते. तुम्ही ते स्वीकारा आणि तुमचे काम करत राहा. मी केवळ माझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. मला मिळणार्‍या संधींचा पुरेपूर उपयोग करण्याचा प्रयत्न करतो, असे तो म्हणाला. 2010 मध्ये पदार्पण केल्यापासून शिखर धवनने भारताकडून 34 कसोटी, 149 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत.