टीव्हीएसच्या दुचाकी झाल्या महाग

    दिनांक :21-May-2022
|
नवी दिल्ली, 
नवीन मोटारसायकल, स्कूटर किंवा स्कूटी खरेदी करू इच्छिणार्‍या लोकांचे स्वप्न महाग होणार आहे. टीव्हीएसने आपल्या दुचाकी वाहनांची किंमत वाढवण्याची घोषणा आज शनिवारी केली. टीव्हीएसची दुचाकी घेण्यासाठी आता 2,100 रुपये जास्त मोजावे लागणार आहे.
 
 
TVS bikes
 
टीव्हीएसने त्याच्या मोटारसायकल सेंगमेंटमध्ये किमती वाढवल्या आहेत. टीव्हीएसने ज्युपिटर स्कूटरच्या किमतीत सर्वाधिक वाढ केली आहे. हे वाहन 2,350 रुपयांनी वाढले आहे आणि त्याची किंमत 78,175 रुपये असणार आहे.