शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते तोतासिंग यांचे निधन

    दिनांक :21-May-2022
|
चंदीगड, 
शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते तसेच राज्याचे माजी मंत्री Totasingh तोतासिंग यांचे आज शनिवारी मोहालीतील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. तोतासिंग यांनी अकाली दल सरकारमध्ये कृषी आणि शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कोअर समितीचे सदस्य होते. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीवरही सदस्य होते.
 
 
Tota-Singh
 
Totasingh तोतासिंग यांनी पहिल्यांदा 1997 मध्ये मोगा मतदारसंघातून आमदारपदाची निवडणूक लढवली होती. प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांनी शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. यानंतर 2002 मधील विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा आमदार झाले. परंतु, 2007 मध्ये त्यांना पराभूत व्हावे लागले. 2012 मध्ये Totasingh तोतासिंग यांनी धरमकोटमधून विजय मिळवला आणि कृषिमंत्री बनले. मात्र, नंतरच्या दोन निवडणुकीत सलगरित्या पराभूत व्हावे लागले.