आता ट्रु कॉलरशिवाय ओळखता येणार कॉलर

    दिनांक :21-May-2022
|
नवी दिल्ली,
ट्रायच्या प्रयत्नांना यश आल्यास, Truecaller ट्रुकॉलरशिवाय कॉल करणार्‍याचे नाव कळू शकणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) लवकरच केवायसी आधारित नाव प्रदर्शनाची पद्धत सुरू करण्याची योजना आखत आहे. यासंदर्भात काही महिन्यांत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला यांनी दिली आहे.
 
 
Truecaller
 
वाघेला म्हणाले, ट्राय आधीच यावर विचार करत आहे, परंतु आता या प्रकरणी दूरसंचार विभागाकडून माहिती मिळाली आहे. या पद्धतीद्वारे Truecaller कॉलरचे नाव तुमच्या फोन स्क्रीनवर लगेच दिसेल. वास्तविक, भारतात अशी सुविधा देणार्‍या कंपन्यांकडून ग्राहकांचा डेटा त्यांच्याकडे जाण्याचा धोका आहे. नवीन केवायसी-आधारित प्रणालीसाठी फ्रेमवर्क तयार झाल्यानंतर, कॉलरची ओळख अधिक स्पष्ट आणि कायदेशीररित्या वैध होईल. सर्व अ‍ॅप्सवरील डेटा नष्ट होईल आणि केवायसीशी संबंधित डेटा राहील याचाही फायदा होईल. मात्र, ही सुविधा ऐच्छिक असेल की अनिवार्य असेल, हे स्पष्ट झालेले नाही.