मारियुपोलवर ताबा मिळवला

    दिनांक :21-May-2022
|
- रशियाने केला दावा
 
पोकरोव्हस्क, 
Ukraine जवळपास तीन महिन्यांच्या युद्धानंतर Mariupol मारियुपोलवर ताबा मिळवला असल्याचा दावा रशियाने केला आहे. आतापर्यंतच्या युद्धात रशियाला मिळालेले हे सर्वांत मोठे यश आहे, असेच म्हणावे लागेल. धोरणात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले तटवर्ती शहर बहुतांश उद्ध्वस्त झाले आहे. येथे 20 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. Mariupol मारियुपोलमधील अ‍ॅझोव्हस्टाल हा पोलाद प्रकल्प ताब्यात घेण्यात आला, असा अहवाल रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगू यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना सादर केला आहे. Ukraine युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात प्रतिकार करण्यात आलेला हा शेवटचा गड होता, अशी माहिती प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी दिली. मात्र, या वृत्ताला Ukraine युक्रेनेने दुजोरा दिलेला नाही. 
 
 
putin dksl
 
पोलाद प्रकल्पात अडकलेल्या 3,439 Ukraine युक्रेनी सैनिकांनी सोमवारपासून आत्मसमर्पण केले. यात शुक‘वारी आत्मसमर्पण केलेल्या 500 सैनिकांचा समावेश आहे. आत्मसमर्पण केल्यावर रशियाने त्यांना कैद केले काहींना दंड केल्या जाणार्‍या ठिकाणी नेले गेले आहे तर, इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. Ukraine युक्रेनी सैन्याच्या आझोव्ह रेजिमेंटला पोलाद प्रकल्पाच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आझोव्ह रेजिमेंटच्या कमांडरला ताब्यात घेण्यात आले असून, त्याला चिलखती वाहनातून पोलाद प्रकल्पातून नेण्यात आले, असे रशियाने सांगितले. पोलाद प्रकल्पाच्या संरक्षणासाठी तैनात सैनिकांनी केलेल्या युद्धगुन्ह्यांची चौकशी केली जाईल, अशी धमकी रशियन प्रशासनाने दिली असून, त्यांना ‘नाझी’ आणि गुन्हेगार ठरवून खटला चालवला जाईल, असे सांगितले.