तंटामुक्ती समितीच्या माजी अध्यक्षाची हत्या

त्रिवेणी संगम येथील घटना

    दिनांक :21-May-2022
|
तभा वृत्तसेवा
अचलपूर, 
अचलपूर शहराजवळील anti-dispute committee परतवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या त्रिवेणी संगम नदी परिसरात तळेगाव मोहना येथील माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष रियाज कुरेशी अब्दुल हारून या 35 वर्षीय इसमाची अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हत्या केली.
 
anti-dispute committee
 
प्राप्त माहितीनुसार, तळेगाव मोहना ता. चांदुर बाजार येथील रहिवासी असलेल्या कुरेशी यांचा जनावरे anti-dispute committee खरेदी- विक्रीचा व्यवसाय होता. तसेच त्यांनी कालीपिली टॅक्सी देखील चालवणे सुरु केले होते. शुक्रवारी सांयकाळ्च्या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर फोन आला. त्यानंतर ते लगेच निघून गेले. त्यानंतर शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास काही लोकांना एक मृतदेह दिसला. त्यांनी लगेच परतवाडा पोलिस स्टेशनला फोन करून माहिती दिली. घटनास्थळ परतवाडा व सरमसपुरा पोलिस स्टेशन यादरम्यान येत असल्याने दोन्ही ठिकाणचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मृत अवस्थेत असलेल्या इसमावर जखमेच्या खुणा असल्यामुळे हत्या झाली असल्याच्या संशयावरून श्वानपथक बोलावण्यात आले. श्वानाच्या मदतीने तपासणी सुरू केली असता घटना घटनास्थळावरून मंदिर परिसरातच श्वान फिरत होते. anti-dispute committee गुन्हे अन्वेषण विभागाची टीम व परतवाडा ठाणेदार घटनेची गंभीरतेने चौकशी करत आहे.