खबरदार...तुम्ही कॉल रेकॉर्ड करता?

    दिनांक :21-May-2022
|
- तर गुन्हा दाखल होणार
 
नवी दिल्ली, 
गुगलने नुकतीच call recording कॉल रेकॉर्डिंग करणारी अ‍ॅप आपल्या प्ले स्टोअरवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल अ‍ॅण्ड्रॉईडच्या आधीपासून मोबाईलमध्ये call recording कॉल रेकॉर्डिंग केले जाते. परंतु, ते बेकायदेशीर असून, शिक्षेस पात्र आहे. तुम्ही अशी चूक केल्यास आणि त्याची तक्रार झाली तर, तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मोबाईल निर्मात्या कंपन्या कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय देत आहेत. परंतु, एखाद्याचा call recording कॉल रेकॉर्ड करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी तुम्हाला संबंधित अधिकार्‍याची परवानगी घ्यावी लागते. यानंतरच तुम्ही एखाद्याचा call recording कॉल रेकॉर्ड करू शकता. यासाठी तुम्हाला पोलिस आयुक्त, अधीक्षक कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी ठोस कारण द्यावे लागेल, ते कारण पटले तरच पोलिस परवानगी देतील. मात्र, या परवानगीशिवाय तुम्ही call recording कॉल रेकॉर्डिंग केले तर ते बेकायदेशीर असल्याचे समजले जाईल.
 
 
call recording
 
भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार प्रत्येक व्यक्तीला गोपनीयतेचा अधिकार आहे. कोणत्याही तृतीय पक्षाच्या परवानगीशिवाय call recording कॉल रेकॉर्ड करणे, पूर्णपणे बेकायदेशीर मानले जाते. यासोबतच हे घटनेतील व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचेही उल्लंघन ठरेल. भारतीय पुरावा कायदा 1872 नुसार, प्रत्येक call recording कॉल रेकॉर्ड न्यायालयात सादर केला जाऊ शकतो. त्याच्या काही अटी आहेत. रेकॉर्ड केलेला आवाज स्पष्ट आणि ओळखण्यायोग्य असणे आवश्यक आहे. call recording रेकॉर्डिंगमध्ये कोणताही हस्तक्षेप नसावा आणि तो प्रकरणाशी संबंधित असावा. रेकॉर्डिंग स्टोरेज उपकरणे सीलबंद करणे आणि पोलिसांच्या ताब्यात देणे आवश्यक आहे तसेच कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय फोटो काढणे आणि व्हिडीओ शूट करणे, हेदेखील कलम 21 चे उल्लंघन मानले जाते.