वणव्यात हजारो झाडांची राखरांगोळी

विविध ठिकाणी लागली आग

    दिनांक :21-May-2022
|
तभा वृत्तसेवा
धारणी, 
बौद्ध पौर्णिमेच्या रात्रभर व्याघ्र तथा प्रादेशिक forest Fire वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी प्राणी गणना केली. मात्र, त्यानंतर ठिकठिकाणी आग लागल्याने एकच खळबळ उडालेली होती. मेळघाटच्या ढाकणा, पोपटखेडा, धारणी परिक्षेत्रामधील चटवा बोड, जारिदा परिक्षेत्राच्या कारंज वर्तुळात आगी लागून हजारो वृक्ष भस्मसात झाल्याची गंभीर forest Fire माहिती आहे. अनेक ठिकाणी वणवा पसरण्यापूर्वीच नियंत्रण करण्यात आले, हे विशेष!
 
forest Fire
 
धारणीपासून 26 कि. मी. अंतरावरील गुगामल forest Fire वन्यजीव विभागातील ढाकणा वनपरिक्षेत्राच्या डोलारच्या जंगलात दोन दिवस आगीचे साम्राज्य राहिले. व्याघ्र विभागाने उशीरा का होईना उपाययोजना करुन आगीवर कसेबसे नियंत्रण केले. मात्र वन्य प्राण्यांच्या वाट्याचे गवत आणि अनेक वृक्ष जळाले. प्रामुख्याने डूंडबल्डा, घेगेला बल्डा, कुवाली डोंगी, खानापूर आणि पळसपाणीच्या जंगलात आग जास्त प्रमाणात होती. प्रादेशिकच्या घटांग भागात पण गेल्या आठवड्यात आगीने कहरच केलेला दिसला. मेळघाटातील जारिदा परिक्षेत्राच्या कारंज जंगलातील दिल्डा नियत क्षेत्रातही आगीने अनेक forest Fire वृक्षांना भस्मसात केले. मात्र समाधानाची बाब अशी की वेळेवर नियंत्रण करण्यात आले.
 
 
पोपटखेडाच्या forest Fire जंगलात पण गेल्या आठवड्यात दोन ठिकाणी आगी लागून वन्य प्राण्यांचे स्थानांतर झाल्याची गंभीर माहिती आहे. ढाकणाच्या जंगलात तेंदूपाने संकलनाचे काम सुरू असल्याने येथील आग मानवनिर्मित असल्याचा संशय आहे. प्रादेशिकच्या धारणी वनपरिक्षेत्रातील चटवा बोड गावालगतच्या नैसर्गिक जंगलात आग लागलेली होती. वनविभागाने तात्काळ दखल घेत आगीवर नियंत्रण केले. मात्र काही झाडांची राखरांगोळी झालीच. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात आगीने खूप नुकसान केलेले आहे. forest Fire जंगलात मानवी प्रवेश वाढल्याने ठिकठिकाणी आग लागत असल्याची चर्चा आहे.