रुग्णाच्या किडनीतून काढले तब्बल 206 स्टोन

    दिनांक :22-May-2022
|
हैदराबाद,
हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर 206 Stones आली आहे. येथे डॉक्टरांच्या पथकाने 54 वर्षीय रुग्णाच्या किडनीतून 206 किडनी स्टोन काढले आहेत. शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना 1 तास लागला. किडनी स्टोनशी संबंधित हे विचित्र प्रकरण तेलंगणा राज्यातील हैदराबादमधून समोर आले आहे. किडनी स्टोनशी संबंधित ही शस्त्रक्रिया येथील 'अवेअर ग्लेगल्स ग्लोबल हॉस्पिटल' नावाच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे.
 
ston
 
माहितीनुसार, हैदराबादच्या नलगोल्ड येथे राहणारे 54 वर्षीय वीरमल्ल रामलक्ष्मय्या हे बऱ्याच दिवसांपासून पोटदुखीची तक्रार करत होते. जेव्हा वेदना तीव्र होते, तेव्हा ते स्थानिक डॉक्टरांकडून औषध घेत होते, ज्यामुळे त्यांना थोड्या काळासाठी आराम मिळायचा. पण हळूहळू त्यांना त्रास वाढू लागला. दरम्यान त्यांनी चाचणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला.  वरिष्ठ सल्लागार यूरोलॉजिस्ट डॉ.पूला नवीन के कुमार यांच्या मते, वीरमल्लची प्राथमिक तपासणी आणि अल्ट्रासाऊंडमध्ये त्यांना किडनी स्टोन असल्याचे समोर आले. सीटी स्कॅननंतर किडनी स्टोनची खात्री झाली. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या टीमने वीरमल्ल रामलक्ष्मीय्या यांच्या किडनीतून 206 किडनी स्टोन 206 Stones काढले. डॉक्टरांच्या टीमला शस्त्रक्रिया करण्यासाठी 1 तास लागला. शस्त्रक्रियेनंतर केवळ 1 दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.