बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरीचा भारतावर परिणाम

    दिनांक :22-May-2022
|
राष्ट्ररक्षा
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
Bangladeshis and Rohingya : 2020 सालापासून दिल्लीत दंगली घडत आहेत. 2019 साली सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात बसविण्यात आलेले शाहीनबाग, त्यानंतर 2020 मध्ये घडविलेली दंगल, 2020 चेच कृषी सुधारणा कायद्यांविरोधातील कथित शेतकर्‍यांचे आंदोलन आणि 26 जानेवारी 2021 रोजी घडविलेली दंगली, आता 2022 सालात जहांगीरपुरीमध्ये झालेली दंगल. यामुळे देशाची राजधानी दरवर्षी हिंसाचारामध्ये होरपळत आहे. यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने हिंदू समाजाला घेरून हल्ले केले गेले. या दंगलीद्वारे देशहिताचे कायदे लागू करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गृहयुद्धाची परिस्थिती घडवू, हा संदेश देण्यात आला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळी संघर्षाची स्थिती निर्माण करण्यापूर्वीची ही रंगीत तालीम तर नव्हे?
 
 
rohingya
 
बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर!
दिल्लीतला जहांगीरपुरी मुस्लिमबहुल आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बसविण्यात आलेल्या शाहीनबागेत सी ब्लॉक, कुशल चौकातूनच भारतात बेकायदेशीरपणे राहणार्‍या 300 Bangladeshis and Rohingya बांगलादेशी आणि रोहिंग्या महिला, मुले आणि पुरुषांना नेण्यात आले होते. त्यानंतर जहांगीरपुरीमध्येही सीएएविरोधी आंदोलनमध्ये महिलांसह लहान मुलांचा वापर करण्यात आला. यावेळीही त्याच भागातून हल्ल्यास प्रारंभ झाला. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा याच काळात झाला. असेच 2020 साली डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौर्‍यावेळीही घडविण्यात आले होते. भारताचे शासन त्यांना मदत करते. त्यांना रेशनकार्ड व निवडणुकीचे ओळखपत्र मिळवून देण्याचे काम आपलेच अधिकारी करतात. पाच हजाराचे पॅकेज दिले की, त्याला बांगलादेशातून उचलून भारतीय शहरापर्यंत सारेच काम केले जाते. गेल्या वर्षामध्ये शहरात भारतीय म्हणून स्थायिक होऊ पाहणार्‍या दीड हजार Bangladeshis and Rohingya बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना विशेष शाखेने अटक केली. घुसखोरांना मायदेशी पोहोचविण्यात आले. मात्र, अधिकारी मुंबईत पोहोचण्याआधी हे घुसखोर परतलेले असतात.
 
 
घुसखोरीचे परिणाम
महिलांवर बलात्कार करणे, त्यांना पळवून नेणे व अवैध व्यापार करणे इत्यादी घटना अनेक Bangladeshis and Rohingya बांगलादेशी आणि रोहिंग्या बहुसंख्य गावात घडत आहेत. तिरंगा जाळणे, राष्ट्रीय सणात दहशतीचे वातावरण पसरवणे हेही तिथे घडते. घरफोड्या, चोर्‍यांचे तर पेव फुटलेले दिसते. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते हा पहिला परिणाम, तर देशातील कामगारांच्या पोटावर पडणारा पाय हा दुसरा परिणाम. स्वस्त दरात काम करणार्‍या बांगलादेशींना जेव्हा येथील व्यापारी व कंत्राटदार जवळ करतात, तेव्हा भारतीय मजूर मात्र बेरोजगारीच्या आणि उपासमारीच्या संकटात सापडतो. संपूर्ण भारतात घुसून बसलेल्या बांगलादेशींचा, आपल्या देशावर पडणारा आर्थिक बोजा हा आणखी एक स्वतंत्र परिणाम आहे. त्याची गंभीर दखल घेणे निकडीचे आहे. त्यांना परदेशातून आर्थिक मदत मिळते. जमिनी खरेदी करण्याच्या उद्योगात ही धनवान मंडळी गुंतली आहे. ते ओळीने घर विकत घेत नाहीत वा शेतीही तशी घेत नाहीत. मधील एक दोन शेत, घर वगळता ते आजूबाजूची घरे, शेती विकत घेतात. त्यामुळे दोन घुसखोरांत भारतिय सापडतात. मग या घुसखोरांच्या लीला सुरू होतात आणि त्याला कँटाळून, शेती वा घर त्यांनाच विकून माणसे मोकळे होतात. भारतिय विस्थापित होतो आणि घुसखोर प्रस्थापित होतो. अशा प्रकारे भारतात जनसांख्यिकीय आक्रमण सुरू झाले आहे. त्याची चिंता ना राजकिय पक्षाना ना नोकरशाहीला ना सामान्य जनतेला.
 
 
बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर
आणि दहशतवादाचा वाढता धोका
अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणारी दहशतवादी यंत्रणा आता पश्चिाम बंगालात पाय रोवून घट्ट उभी राहिली आहे. घुसखोर Bangladeshis and Rohingya बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या जिवावर तृणमूल काँग्रेस मोठी झाली.देशाच्या सुरक्षेला धोक्यात आणून मिळवलेली सत्ता येथील घुसखोरांच्या उपद्रवाला कायम पाठीशी घालत आली आहे. पश्चिम बंगालमधील जमिनीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होत असतानाच येथील राज्य सरकारने हाताची घडी तोंडावर बोट हे स्वीकारलेले धोरण देशासाठी घातक आहे. जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेशसारख्या अतिरेकी संघटना भारतात सुरुंग पेरून आहेत. Bangladeshis and Rohingya बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा संबंध जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश या संघटनेशी असून पश्चिरम बंगालमध्ये त्यांनी सुमारे 58 अतिरेकी गट तयार केले आहेत. अल कायदाने बांगलादेशात सारखे राज्य स्थापन करण्याचे ठरवले आहे. यासाठी पश्चिनम बंगाल, आसाम आणि उत्तर म्यानमारच्या मुस्लिमांची मदत करावी किँवा प्रसंगी बंड ही पुकारावे, असा मजकूर असणारे पत्रकही गुप्तचर खात्याच्या हाती लागले आहे. पश्चिेम बंगालमध्ये निर्माण केलेले ग्रेनेड बांगलादेशला पाठवण्यात आले आहेत. तपास यंत्रणोला राज्यातील जिहादी दहशतवादी गटांचा संबंध शेजारी राष्ट्रातील दहशतवादी गटाशी असल्याचे दिसून आले आहे. ही बाब बांगलादेश सरकारने देखिल, केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. या सर्व घटनांवरून पश्चिम बंगालमध्ये जिहादी तत्त्वांचा शिरकाव झाल्याचे दिसते.
 
 
बांगलादेशींना मदत करणार्या स्लीपर सेलसना शोधणे सर्वात महत्वाचे
Bangladeshis and Rohingya : एखादा अतिरेकी भारतात काही घातपात करतो तेव्हा त्याला भारतातले पत्ते, महत्त्वाची ठिकाणे, वाहतुकीच्या सोयी, पासपोर्ट, मोबाईल कार्ड, फोन, राहण्याची जागा इत्यादी गोष्टी आपोआप मिळत नाहीत. कोणी तरी स्थानिक व्यक्ती त्यांना मदत करत असतेच. माहिती देत असते म्हणूनच या घातपाती कारवाया यशस्वी होतात. अशी मदत करण्यासाठी कार्यरत असणार्याा संघटनांच्या अड्डयांना स्लीपर सेल म्हटले जाते. पोलीस हे सेल उद्ध्वस्त करण्याचा म्हणावा तसा प्रयत्न करत नाहीत, त्यात काम करणारे लोक अनेकदा उघडपणे काम करूनही मोकळे राहतात,काही वेळा या स्लीपर सेल्सचे स्वरूपच असे काही असते की त्यांना अटक करणे राजकिय कारणामुळे शक्य होत नाही. स्लीपर सेल हे दहशतवादी संघटनांना मदत करणारे एक जाळेच असते.
 
 
Bangladeshis and Rohingya : स्लीपर सेलचा सदस्य कधीच उघड होत नाही. अशा स्लीपर सेलच्या छुप्या हालचाली टिपण्याचे काम फार बारकाईने करावे लागते. या करता पोलिसांना सतत जागरूक रहावे लागते. एखाद्या वस्तीत नवा आलेला माणूस कोण आहे, कोणत्या वस्तीतली काही मुले एकदम बेपत्ता झाली आहेत, एखादा तरुण मध्येच काही दिवस बेपत्ता होऊन एकदम उगवला आहे, तेव्हा तो कोठे होता, त्याबाबत लोक काय बोलतात अशा बारीक-सारीक माहितीवर सतत लक्ष ठेवावे लागते. या दृष्टीने प्रत्येक पोलीस ठाण्यावर दोन दोन खास प्रशिक्षण दिलेले पोलीस नेमण्यात यावेत. त्या परिसरात असा एखादा स्लीपर सेल कार्यरत आहे का आणि असला तर त्या दृष्टीने काही छुप्या हालचाली होत आहेत का यावर लक्ष ठेवणे हे त्यांचे एकच काम असावे. स्लीपर सेलचे सदस्य आपापला व्यवसाय करत असतात. तो एखाद्या स्लीपर सेलचा सदस्य आहे याचा पत्ता कोणालाही लागत नाही. भारतात असे 250-300 स्लीपर सेल .या स्लीपर सेल्सचे 2000-2500 सदस्य असावेत .आता हे स्लीपर सेल उद्ध्वस्त करायचे आहे. घुसखोरी करून भारतात आलेल्या बांगला देशी घुसखोरांना त्यांची ओळख पटवून त्यांच्या देशात परत पाठवले पाहिजे आणि या लोकांना भारतात राजकीय आणि अन्य सर्व प्रकारचा आश्रय देणार्याांविरुद्ध, मग ते राजकीय नेते असले तरी, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. बांगलादेशी समर्थकांनवर कारवाइ करणे जास्त महत्वाचे आहे.
 
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
- 9096701253