सेवा-उत्पादन क्षेत्रापुढील आव्हानांची चर्चा

    दिनांक :22-May-2022
|
अर्थचक्र
 
- महेश देशपांडे
उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये सध्या शक्याशक्यतांचं भाकीत पाहायला मिळत आहे. काही उत्पादनांच्या किमतींमुळे उत्पादक किंवा ग्राहकवर्ग धास्तावलेला दिसत असून काही सेवांना मिळणारा प्रतिसाद किंवा त्याविषयी बाजारात सुरू असलेली चर्चा तरंग उमटवत आहे. उदाहरणादाखल पाहायचं तर एकीकडे Online sales ऑनलाईन औषध विक्रीवर कारवाईची मागणी पाहायला मिळत असताना एलन मस्क ट्विटर खरेदीच्या घोषणेचा पुनर्विचार करणार असल्याची बातमी पुढे येत आहे. पुढील काही दिवसांमध्ये गव्हाचे दर उतरणार असे वृत्त समोर येत असतानाच दोन वर्षांनंतर कर्मचार्‍यांना मर्यादित पगारवाढ मिळण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट) ने ई-फार्मसीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. Online sales ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बनावट, चुकीची किंवा भेसळयुक्त औषधं विकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी ‘कॅट’कडून करण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ई-फार्मसीच्या नावाखाली या Online sales ऑनलाईन कंपन्या परवानगी नसलेल्या औषधांचीही विक्री करीत आहेत. देशातल्या अनेक मोठ्या परदेशी आणि देशी कॉर्पोरेट कंपन्या ऑनलाईन फार्मसीमधून औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्याकडून औषध आणि कॉस्मेटिक कायद्याचं सतत उल्लंघन होत आहे.
 
 
online_pharmacy
 
‘कॅट’च्या मते देशातल्या करोडो घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. Online sales ऑनलाईन फार्मसी ग्राहकविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याने भारतीय ग्राहकांची सुरक्षा आणि आरोग्य धोक्यात आलं आहे. देशातल्या औषधांचं उत्पादन, आयात, विक्री आणि वितरण हे औषध आणि सौंदर्य प्रसाधनं कायदा आणि नियमांद्वारे नियंत्रित केलं जातं. त्यानुसार औषधांचा प्रत्येक आयातदार, उत्पादक, विक्रेता किंवा वितरक यांच्याकडे वैध परवाना असणं बंधनकारक आहेच; शिवाय सर्व औषधं नोंदणीकृत फार्मासिस्टनेच देणं बंधनकारक आहे. तथापि, ई-फार्मसी मार्केटप्लेस देशातल्या कायद्यातल्या त्रुटींचा गैरवापर करीत आहेत. एवढंच नाही, तर प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं विकून आणि नोंदणीकृत फार्मासिस्टशिवाय औषधांचं वितरण करून निष्पाप भारतीय ग्राहकांच्या जिवाशी खेळत आहेत. ई-फार्मसी, टाटा, नेटमेड्स आणि मेझॉन फार्मसीसारख्या ई-फार्मसी मार्केटप्लेस या उघड उल्लंघनांमध्ये आघाडीवर आहेत. त्यांच्या मनमानी वृत्तीला लवकरच आळा घातला पाहिजे, असं मत व्यक्त केलं जात आहे. ‘कॅट’ने म्हटलं आहे की, सरकारने फक्त त्या Online sales ई-फार्मसींना परवानगी द्यावी; ज्यांच्याकडे औषधं ई-फार्मसीवर विकण्याची परवानगी आहे आणि उर्वरित सर्व ई-फार्मसी बंद करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. तसंच, ई-फार्मसी युनिट आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला वेब पोर्टल सेट करण्याची परवानगी दिली जाऊ नये.
 
 
Online sales : वाढत्या महागाईच्या पृष्ठभूमीवर सर्वसामान्यांसाठी खूशखबर आहे. पुढील काही दिवसांमध्ये गहू स्वस्त होऊ शकतो. वास्तविक सरकारने गव्हाचा साठा आणि किमतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीत अन्नधान्य वाटपासाठी नवीन आदेश जारी केला आहे. आठवडाभरात गव्हाचे भाव उतरण्यास सुरुवात होईल. स्वस्त गव्हामुळे पिठाचे दरही घसरणार आहेत. देशातला गव्हाचा साठा कायम ठेवण्यासाठी गव्हाच्या निर्यातीचा आदेश जारी करण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत गव्हाचा साठा कमी होणार नाही. वाणिज्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले की, देशात घरगुती वापरासाठी पुरेल इतका गव्हाचा साठा आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पृष्ठभूमीवर शेजारील देश आणि अन्य गरजू देशांच्या विनंतीनुसार गहू निर्यात केला जाऊ शकतो. आमची प्राथमिकता देशाच्या अन्नसुरक्षेला आहे. कृषी मंत्रालयाच्या तिसर्‍या अंदाजानंतर त्यावेळची परिस्थिती पाहून निर्यातबंदीचा आढावा घेता येईल. सरकारचा निर्यातबंदीचा आदेश कायम नाही. वेगाने वाढणार्‍या महागाईला आळा घालण्यासाठी भारताने गव्हाच्या निर्यातीवर तत्काळ बंदी घातली आहे. भारताने यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती. भारताच्या या निर्णयावर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर जी-7 गटाने भारताच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. जर्मनीचे कृषी मंत्री केम ओझदेमिर म्हणाले की, भारताच्या या निर्णयामुळे जगात अन्न संकट वाढेल. रशिया आणि युक्रेन हे अन्नधान्य निर्यात करणारे जगातले दोन मोठे देश आहेत; पण यावर्षी रशियाने युक्रेनमध्ये युद्ध पुकारल्यामुळे शेती होऊ शकली नाही आणि जगभरातल्या सर्व देशांनी रशियावर व्यापार निर्बंध लादले. यामुळे जगभरात अन्नधान्याचं मोठं संकट निर्माण झालं. युक्रेन आणि रशियाकडून पुरवठ्यावर परिणाम झाल्यानंतर भारताकडून गव्हाच्या मागणीत वाढ झाली आहे. युक्रेनने आपल्याकडे 20 दशलक्ष टन गहू असल्याचं म्हटलं असलं, तरी युद्धामुळे त्याचा व्यापार मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. गव्हाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीबाबत अधिकार्‍यांनी सांगितलं की, गव्हाच्या अनियमित निर्यातीमुळे भाव वाढले. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असं पाऊल उचलण्यात आलं. जर्मनीचे कृषी मंत्री म्हणाले की, आम्ही भारताला जी-20 सदस्य म्हणून आपली जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन करतो.
 
 
Online sales : इकडे ट्विटर खरेदीची घोषणा केल्यानंतर आता एलन मस्क यांनी अचानक हा व्यवहार थांबवला. त्यांचं म्हणणं आहे की, सुमारे पाच टक्के ट्विटर वापरकर्ते बनावट आहेत. त्यामुळे ते आपल्या व्यवहाराचा पुनर्विचार करीत आहेत. या प्लॅटफॉर्मवरील बनावट खात्यांची संख्या स्पष्ट होईपर्यंत एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा करार थांबविला आहे. ट्विटरने अमेरिकेच्या ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’ला पाठविलेला अहवाल समोर आल्यानंतर एलन मस्क यांनी ही घोषणा केली. असं सांगण्यात आलं आहे की, संपूर्ण जगात ट्विटरच्या कमाई करण्यायोग्य दैनिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 22 कोटी 90 लाख आहे; त्यापैकी पाच टक्के वापरकर्ते फेक अकाऊंट्सद्वारे ट्विटरवर कार्यरत राहतात; जे दररोज ट्विटरवर ‘लॉग इन’ करतात आणि या दरम्यान त्यांना या प्लॅटफॉर्मवर काही जाहिराती दाखवल्या जातात. त्यांना ‘कमाई करण्यायोग्य दैनिक सक्रिय वापरकर्ते’ म्हणतात. त्यानुसार 22 कोटी 90 लाख युजर्सपैकी 1 कोटी 14 लाख युजर्स फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून दररोज ट्विटरवर प्रवेश करतात. डेटा रिपोर्टनुसार, 2010 मध्ये जगभरात ट्विटरच्या वापरकर्त्यांची एकूण संख्या 540 दशलक्ष होती; पण 2021 मध्ये ही संख्या सुमारे 40 कोटींवर गेली आहे. त्यातले 2 कोटी 21 लाख वापरकर्ते एकट्या भारतात आहेत.
 
 
Online sales : ट्विटरवरील फेक अकाऊंट ही मोठी समस्या आहे. मस्क यांनी यावर्षी 22 एप्रिल रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटलं होतं की, ते एक तर ट्विटरवरून फेक अकाऊंट काढून टाकतील किंवा असा प्रयत्न करणार्‍यांना तो शक्य होणार नाही, हे पाहतील. त्यांची खाती बंद होतील. 5 एप्रिल रोजी केलेल्या एका ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं की, ट्विटरची सर्वात त्रासदायक बाब म्हणजे त्यावरील फेक अकाऊंट्स. ट्विटरवरची बनावट खाती बंद करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले; मात्र यामध्ये कंपनीला फारसं यश मिळालं नाही. फेक अकाऊंट चालविणारे ट्विटरवर चुकीची माहिती पसरवतात. याशिवाय या फेक अकाऊंट्सचा वापर कोणत्याही व्यक्ती, कंपनी, नेता किंवा कोणत्याही देशाला ट्रोल करण्यासाठीही केला जातो. ही बनावट खाती ट्विटरची विश्वासार्हता कमी करतात. फेसबुकचे जगभरात 291 दशलक्ष वापरकर्ते आहेत. इन्स्टाग्रामचे 147 दशलक्ष वापरकर्ते आहेत तर स्नॅपचॅटचे 550 दशलक्ष वापरकर्ते आहेत. युट्यूबचे जगभरात 256 कोटी वापरकर्ते आहेत. व्हॉट्स अ‍ॅपचे 200 कोटी वापरकर्ते आहेत.
 
 
Online sales : दरम्यान, पगारवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. चालू वर्षात जवळपास सर्वच क्षेत्रातल्या कर्मचार्‍यांचा पगार वाढण्याची शक्यता आहे. ‘टीमलीज’च्या ‘जॉब्स अँण्ड सॅलरी प्राईम रिपोर्ट, 2021-22’ नुसार गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी जवळपास सर्वच क्षेत्रातल्या कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ करू शकतात. यावर्षी जवळपास सर्वच कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ होईल; मात्र ही पगारवाढ मर्यादित असेल. यावर्षी पगारामध्ये 8.13 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असंदेखील या अहवालामध्ये म्हटलं आहे. विविध 17 व्यावसायिक क्षेत्रांचा अभ्यास करून हा अहवाल बनविण्यात आला आहे. हा अहवाल देशातल्या महत्त्वाच्या नऊ शहरांमधल्या कर्मचार्‍यांच्या पगारावर आधारित आहे.
 
(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)