रशियाचा मोठा निर्णय...'या' 963 लोकांना 'नो एंट्री'

    दिनांक :22-May-2022
|
मॉस्को,
रशिया-Russia युक्रेन युद्ध सुरू होऊन जवळपास तीन महिने झाले आहे. दरम्यान रशियाने 963 अमेरिकन लोकांची यादी जारी केली आहे ज्यांना रशियामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. महत्वाचे म्हणजे या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचीही नावे आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेने रशियावर व्यावसायिक आर्थिक हालचालींवर अनेक निर्बंध लादले आहेत. रशियाच्या अमेरिका नो एंट्रीचे हे पाऊल याला विरोध म्हणून मानले जात आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवरील नो-एंट्री यादीमध्ये अमेरिकन सरकारी अधिकारी, कायदेतज्ज्ञ आणि अनेक प्रमुख व्यक्तींची नावे आहेत. रशियाने कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नी सोफी ट्रूडोसह आणखी 26 कॅनेडियन लोकांवर निर्बंध लादले आहेत.
  
rasiyaf
रशिया Russia आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रशियावर या निर्बंधांचा फारसा परिणाम झालेला नाही. सर्व प्रकारच्या निर्बंधांना तोंड देत असलेल्या रशियाने कठोर निर्णय घेत 963 प्रमुख अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली आहे जे यापुढे रशियात प्रवेश करू शकणार नाहीत. रशियाच्या या निर्णयाकडे धक्कादायक पाऊल म्हणून पाहिले जात आहे. रशियाचे म्हणणे आहे की, मॉस्को प्रामाणिक चर्चेसाठी नेहमीच तयार होता, आहे आणि राहील.