अमेरिकेच्या दबावाला न Modi जुमानता रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे आणि मोदींचे कौतुक केले आहे. मोदी सरकारने कच्च्या तेलावरील उत्पादन शुल्कात कपात केल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्याचबरोबर यावर राजकारण सुरू आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावरून देशात आणि पाकिस्तानातही राजकारण तापले आहे. पाकिस्तानमध्ये महागड्या पेट्रोल आणि डिझेलमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. त्याचवेळी देशाची बुडत चाललेली अर्थव्यवस्था कशी वाचवायची, हे सरकारमध्ये बसलेल्या राजकारण्यांना समजत नाही. दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्याचं कौतुक केलं आहे. भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे कौतुक करताना खान म्हणाले की, भारत अमेरिकेसह कोणत्याही देशाच्या दबावाला बळी न पडता आपल्या नागरिकांच्या हितासाठी स्वतंत्रपणे निर्णय घेतो. त्यामुळेच भारताने रशियाकडून तेल खरेदी करून आपल्या नागरिकांना दिलासा दिला आहे.