पोकळ धमक्या कुणाला देता ?

    दिनांक :22-May-2022
|
प्रहार
दिलीप धारूरकर
 
ग्यानवापी मशिदीत सर्वेक्षणाचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला तेव्हा अजून सत्य बाहेर येण्याआधीच मुस्लिम मंडळींची ओरड hollow threats सुरू झाली होती. तेथे बाबा विश्वनाथ प्रकट झाले. शिवलिंग सापडल्याची बातमी पसरली. तिकडे मथुरेचे एक प्रकरण न्यायालयात दाखल झाले. इतके होताच ओवैसीपासून ते गल्लीतील मुल्ला मौलवींपर्यंत थयथयाट सुरू झाला आहे. मुस्लिमांना भडकविण्याचा उद्योग सुरू झाला आहे. मुस्लिम सर्व आपल्या मुठीत आहेत आणि त्यांच्या जिवावर त्यांना भडकावून आपण काहीही करू शकतो hollow threats अशा भ्रमात असलेली मंडळी ग्यानवापीच्या विषयावर भडक विधाने करू लागली आहेत. या भडक विधानामागे मुस्लिम समाजाला चिथावणी देण्याचा डाव आहे. यांना वेळीच रोखले पाहिजे. असल्या पोकळ धमक्या hollow threats यापुढे चालणार नाहीत हे यांना स्पष्टपणे सांगितले गेले पाहिजे.
 
kashi
 
अकबरुद्दीन ओवैसी याने अगदी जाहीरपणे ते उर्मट विधान केले होते. ‘पंधरा मिनिटे पोलिस हटवा आणि मग बघा आम्ही काय करतो ते' असे ते विधान होते. आता ग्यानवापीचे सत्य बाहेर आल्यानंतर तशीच भाषा वेगळ्या शब्दात चालली आहे. काही तर थेट देशाची बरबादी होण्याची धमकी hollow threats देत आहेत. वास्तविक ग्यानवापी मशिदीचा विषय काही विश्व हिंदू परिषद, रा. स्व. संघ किंवा कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनेने काढलेला विषय नव्हता. काही महिलांनी ग्यानवापी मशिदीच्या परिसरात असलेल्या शृंगार गौरीची पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात दाखल केली होती. त्यावर जिल्हा न्यायालयाने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. या सर्वेक्षणात सत्य बाहेर येईल या कल्पनेने मुस्लिम संघटना आणि नेते यांचा विरोध सुरू झाला. न्यायालयाचे हे आदेश म्हणजे १९९१ ला संसदेने केलेल्या कायद्याचे उल्लंघन आहे असे खुसपट काढून विरोध hollow threats सुरू झाला. मात्र त्याने काही फरक पडला नाही. सर्वेक्षण सुरूच राहिले. सर्वेक्षणात साक्षात सत्य प्रकटले. बाबा विश्वनाथच वजुखान्यात दिसले. पाणी काढताच शिवलिंग प्रकट झाले. औरंगजेबाच्या काळात मंदिर फोडून उद्दामपणे मशीद बांधण्यात आली होती. हिंदूंच्या आस्थेचे हे सर्वोच्च ठिकाण मुद्दाम कलंकित केले होते. ‘काशीस जावे, नित्य वदावे' अशी जी काशीची महती ज्या विश्वेश्वरांमुळे आहे त्या विश्वेश्वरालाच बंदी बनवून टाकले होते. नव्हे रोज तेथे हात, पाय धुवून रोज अपमानित करण्याचा संतापजनक प्रकार चालू होता.
 
 
औरंगजेबाने काशी विश्वनाथ आणि मथुरा येथे अगदी आदेश देऊन मंदिरे पाडली आणि मशिदी बनवल्या ही इतिहासात नमूद केलेली गोष्ट आहे. मात्र, राजकीय लांगूलचालनाच्या लाचार प्रकारात स्वराज्यानंतर या गोष्टी दुरुस्त करण्याची इच्छा सुद्धा सत्तेत बसणाऱ्यांना झाली नाही. सत्तेचा मलिदा दोन्ही हातांनी अनेक पिढ्यांनी चापत रहायचा असेल तर गप्प बसा आणि लांगूलचालन चालूच ठेवा इतकेच या लोकांनी ठरवले. त्यामुळे सोमनाथच्या जीर्णोद्धाराला पंडित नेहरूंनी विरोध केला. hollow threats त्यांचाच कित्ता पुढे गिरवला गेला. अयोध्या, काशी आणि मथुरा तसेच बंदिवासात राहिले. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी स्वतंत्र भारतात प्रचंड मोठे आंदोलन उभे करावे लागले. स्वराज्य मिळाल्यानंतर राजकारणाची आणि समाजकारणाची दिशा कुठे चुकली आहे हे श्रीरामजन्मभूमी आंदोलनाने देशातील जनतेच्या नजरेस आणून दिले. जनतेने मग मतनिश्चितीची दिशाच बदलून टाकली आहे. आता हिंदुत्वविरोधकांना पोटदुखी सुरू झाली आहे.
 
 
ग्यानवापी मशिदीत शिवलिंग प्रकट होताच मुस्लिमांचे आपणच नेते आहोत अशा थाटात वावरणारे ओवैसी महाशय लगेच बोलू लागले. ते म्हणतात की, ‘मी २०- २१ वर्षांचा होतो त्यावेळी बाबरी मशीद आमच्याकडून हिसकावून घेण्यात आली. आता १९-२० वर्षांच्या मुलांच्या डोळ्यादेखत पुन्हा आम्ही दुसरी मशीद जाऊ देणार नाही.' अरे व्वा! म्हणजे देशाच्या इतिहासात आमच्या डोळ्यादेखत नव्हे तर आमच्या शेकडो लोकांच्या हत्या करत आमची आस्था असलेली मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. तेथे मशिदी बांधण्यात आल्या. हा इतिहास धडधडीत लिहिला गेला. बाबरी येथे पुरातत्त्व खात्याच्या संशोधनात तेथे आधी मंदिर होते हेच सत्य बाहेर आले. नंतर सर्वोच्च न्यायालयात तेच सिद्ध झाले. मात्र ते सर्व नाकारून आपल्यावरच अन्याय झाल्याचा कांगावा करायचा हे बंद झाले पाहिजे. काशी आणि मथुरा येथील मंदिरे उपकार म्हणून यांच्याकडून कोणी काढून घेत नाही तर अधिकार, हक्क आणि न्याय म्हणून घेण्याचा विषय चालला आहे. आता तर ही मंडळी न्यायालयांवर आणि लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह लावायला निघाली आहेत. ओवैसी मालेगाव येथे बोलताना म्हणाले की ‘आता आपण सत्तेतील सत्ताधीश बदलू शकतो या भ्रमात राहू नका. ते आता आपल्या हातात नाही.' न्यायालयावर तर हे सरळसरळ प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. न्यायालये आणि लोकशाही मान्य नाही तर मग यांचा मार्ग काय तर हिंसाचार करण्याचा. कायदा हात घ्याल तर त्याची सर्वाधिक किंमत मोजावी लागेल हेही यांना जरा सांगावे लागेल.
 
 
काँगे्रसमध्ये राहून अल्पसंख्यकांचा नेता असल्याच्या कैफात वाटेल ते बडबडणारा तौफिक रझा म्हणतो की, ‘अशा प्रकारे सरकारला प्रत्येक मशिदीला मंदिर बनवायचे आहे, बेईमानी करायची आहे. त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. hollow threats बाबरी मशिदीचा निकाल खोटा होता हे जगाला माहीत आहे, असे ते म्हणाले. आमची असहायतेला आमची कमजोरी मानू नका.' hollow threats म्हणजे न्यायालयांचा सरळ सरळ अवमान करण्याचा उर्मटपणा आहे. यांच्यावर अवमानाचा खटला चालवून तुरुंगात डांबले पाहिजे. हे महाशय म्हणतात तो खोटेपणा कोणाचा आणि किती वर्षांपासून चालू आहे हे ग्यानवापी मशिदीत भिंतींवर दिसलेल्या स्वस्तिक, त्रिशूळ या प्रतिमांमधून, प्राचीन मंदिरांच्या नक्षीकामावरून, भग्न मूर्तींवरून दिसून आले आहे. न्यायालयांनी समोर आलेल्या तथ्य, पुराव्यांवरून निकाल दिले आहेत. शिवाय या मशिदी अगदी औरंगजेबाच्या आदेशावरून मंदिर पाडून बांधल्या असल्याचे इस्लामिक सत्ताधीशांच्या वळचणीला असलेल्या बखरी लिहिणाऱ्यांनीच लिहून ठेवले आहे. तरीही आजच्या न्यायालयांना खोटे ठरविण्याचा कांगावा कशाकरिता करीत आहेत. सत्य उघडे पडू लागले तेव्हा कांगावखोर बेशरमपणा सुचू लागतो तो असा.
 
 
बाबरी मशीद प्रकरणातील एक पक्षकार हाजी महबूब याने तर सरळसरळ धमकी hollow threats दिली आहे. तो म्हणतो की ‘ग्यानवापी आणि मथुरा प्रकरणात जर मुस्लिम समुदायाने आंदोलन केले तर म्हणे देशाला बरबादीपासून कोणीच वाचवू शकणार नाही.' तो आणखी म्हणतो की, ‘ बाबरीनंतर रा. स्व. संघ आता ग्यानवापी मशीद आणि मथुरेची शाही ईदगाह मशीद यांच्या मागे लागले आहेत. त्यांनी हे विसरून जावे. कारण आता यावेळी मुसलमान मागे हटणार नाहीत.'
 
 
देशाच्या बरबादीची भीती हे महाशय कोणाला दाखवत आहेत. या देशाच्या बरबादीचे स्वप्न पाहणाऱ्या या बेशरमांचे या देशाशी काही नाते आहे की नाही? देशाची बरबादी झाली तर यांची उन्नती होणार आहे की यांचीच बरबादीच होणार आहे? अयोध्या आंदोलनानंतर देशातील हिंदू वरचेवर जागृत आणि संघटित झाला आहे. या जागृत आणि संघटित हिंदू शक्तीचा उपयोग अयोध्येच्या त्या घटनेनंतर आजपर्यंत चुकीच्या पद्धतीने ना संघाने केला आहे ना विश्व हिंदू परिषदेने केला आहे, ना कोणीही अन्य संघटनेने! या संघटित आणि जागृत शक्तीचा उपयोग नरेंद्र मोदींच्या भाषेत बोलायचे तर सब का साथ सब का विकास, सब का विश्वास आणि यासाठीच केला जात आहे. ज्ञानवापी आणि मथुरा हे काळाच्या ओघात सहज न्यायप्रक्रियेतून प्रकट झालेले विषय आहेत. त्यातील सत्य बाहेर येत असताना ते स्विकारण्याऐवजी आक्रस्ताळेपणा, थयथयाट करत चिथावणीखोर hollow threats भाषणे कराल तर खबरदार ! या देशातील जनता, या देशातील कायदा आणि या देशातील सत्ता असल्या पोकळ धमक्यांना hollow threats भीक घालणार नाही. आता असल्या धमक्या, हिंसाचाराची भीती आणि गठ्ठा मतांची सौदेबाजी सत्याची वाट अडवू शकणार नाही. मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितले की, ‘ आम्ही देशातील मुस्लिमांमध्ये प्रतिक्रिया उमटेल म्हणून पाकिस्तानविरोधात कारवाई किंवा प्रतिहल्ला केला नाही.' राजकीय स्वार्थाकरिता देशहिताचा बळी देण्याचे ते दिवस आता गेले आहेत.
 
 
hollow threats आता राष्ट्रहिताकरिता प्राणांचे बलिदान देण्याला मागेपुढे पाहणार नाही असा विचार करणारे सत्तेत आले आहेत. त्यामुळे देशाची बरबादी करण्याची धमकी कोणी दिली तर त्याची बरबादी निश्चित असे समजा. जे सत्य आहे ते सत्य आहे. जो इतिहास आहे तो इतिहास आहे. जे सत्य इतिहासातून समोर आले आहे ते स्विकारा. आक्रस्ताळेपणा तुमचा इतिहासातील उर्मटपणा आणि अन्याय झाकू शकणार नाहीत. आता समोर असलेल्या न्यायालयांचा अवमान करण्याची कल्पनाही करू नका. ज्ञानवापीच्या निमित्ताने ही मंडळी कसा विचार करतात ते उघड झाले आहे. मुस्लिम समाजातील विचारी लोकांनीच यांची डोकी जरा ठिकाणावर आणली पाहिजेत. नाहीतर ते काम या देशातील कायदा, सरकार आणि संघटित जनता करेल यात शंकाच नाही !