weekely-horoscope

    दिनांक :22-May-2022
|
साप्ताहिक राशिभविष्य  
 
 
sa
 
मेष : अपेक्षित यश मिळावे
weekely-horoscope : या आठवड्यातील प्राप्त ग्रहमान आपल्याला सर्वप्रकारचे बळ देत असल्यामुळे शिक्षण पूर्ण करून नोकरी-व्यवसायाच्या दिशेने प्रयत्न करीत असलेल्या युवकांना त्यांची स्वप्ने पूर्ण होताना दिसू लागतील. स्पर्धा परीक्षा, विविध प्रवेश चाचण्यांमध्येदेखील सरशी साधता येईल. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. अपेक्षित यश मिळेल. प्रगतीचा अनुभव घेता येईल. या राशीच्या तरुण वर्गास जीवनाचा जोडीदार शोधण्याच्या दृष्टीनेही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
शुभ दिनांक - 22, 24, 27, 28.
 
 
वृषभ: सामाजिक प्रतिष्ठा वाढावी
या आठवड्यातील ग्रहांचे भ्रमण आपल्याला यश व प्रसिद्धी देणारे आहे. यामुळे आपल्याभोवती एक वलय निर्माण होऊन त्याचा फायदा आपणास सामाजिक मानसन्मान, प्रतिष्ठा आदी लाभाच्या स्वरूपातही होऊ शकतो. आपला जनसंपर्क वाढता राहील. व्यवसायात नवी गुंतवणूक, व्यवसाय विस्तार, नवीन शाखा उघडणे असेही निर्णय आपणास घेता येऊ शकतील. नोकरीत या काळातील कामाचे दूरगामी लाभ नक्कीच मिळू शकतात. युवकांना उत्तम शैक्षणिक यश लाभावे. युवांना लवकरच विवाह योग संभवतात.
शुभ दिनांक - 22, 24, 25, 28.
 
 
मिथुन : स्वभावात उग्रपणा नको
weekely-horoscope : या आठवड्यात आपल्याला लाभलेले ग्रहमान बरेचसे अनुकूल असले, तरी सारे व्यवहार करताना, मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करताना पुरेशी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. यासोबतच आपल्या व्यवहारात काहीसा उग्रपणा व निष्काळजी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या व्यवहाराने कुणीही व विशेषतः जोडीदार, सहकारीवर्ग दुखावला जाऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. नोकरी शोधणार्‍या युवांना लवकरच चांगल्या संधी लाभतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासही संभवतो.
शुभ दिनांक - 23, 25, 27, 28.
 
 
कर्क : ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी
या आठवड्यात लाभलेली ग्रहस्थिती पाहता आपले कर्मस्थान बलवान होताना दिसत आहे. यामुळे नोकरी-व्यवसायात आपले महत्त्व वाढू शकते. कर्मक्षेत्रासंबंधीच्या आपल्या योजनांना यश मिळावे. हे ग्रहमान आपणास काही धाडसी पावले उचलण्याचे बळ देईल. त्याचवेळी स्वतःच्या स्वभावावर, वागण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने, मार्गदर्शनाखाली कामे केल्यास त्यात मिळणार्‍या यशाचे व आनंदाचे प्रमाण निश्चितपणे वाढेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
शुभ दिनांक - 22, 25, 26, 27.
 
सिंह : काहीशी खर्चिक सुरुवात
weekely-horoscope : प्राप्त ग्रहस्थिती पाहता या आठवड्याची सुरुवातच काहीशी खर्चिक होणार आहे. मात्र, आार्थिक आवकही मजबूत असल्याने आपला ताळेबंद समाधानकारक राहील. संततीविषयक काही किरकोळ प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यावरून कुटुंबांमध्ये पेचप्रसंगही निर्माण होऊ शकतात. त्या प्रसंगांना धैर्याने, समजूतदारपणे व संयमाने तोंड देण्याची गरज आहे. मुलांना विश्वासात घेऊन, त्यांना असहाय वाटणार नाही अशा पद्धतीने मार्ग काढावा. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात तर संकट दूर होऊ शकेल.
शुभ दिनांक - 23, 24, 27, 28.
 
कन्या : व्यावसायिक कामांना वेग
या आठवड्यात लाभलेली ग्रहस्थिती पाहता आपली व्यावसायिक आणि सरकारी कामे वेगाने होऊ शकतील. आतापर्यंतच्या कुंद झालेल्या स्थितीतून आपणास आता नक्कीच काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, आपणास पुरेसे सक्रिय होणे आवश्यक आहे. काहींच्या स्वभावात काहीसा उग्रपणा निर्माण होऊ शकतो; मात्र आपल्या वागण्याने, बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. दरम्यान, आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने सांभाळून चालवावीत. घाई, गडबड टाळा.
शुभ दिनांक - 22, 23, 24, 25.
 
 
तूळ: कार्यक्षेत्रात प्रसन्नतेचे वातावरण
weekely-horoscope : या आठवड्यात आपल्याला लाभलेले ग्रहमान कार्यक्षेत्रातील मजबूत स्थिती दर्शवीत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात या सप्ताहात प्रगती व प्रसन्नतेचे वातावरण राहील. आर्थिक आवक वाढेल. दरम्यान, या काळात प्रकृती जपणे आवश्यक आहे. विशेषतः हाडे व स्नायूंशी संबंधित दुखणी डोके वर काढू शकतात. त्यावर सुयोग्य उपचार केले पाहिजेत. कुटुंबाची आर्थिक स्थिती उत्तम राहील. युवांना विवाहादी शुभ संधी लाभू शकतात. काहींना प्रवासही घडू शकतो. कुटुंबात आनंदाचे व समाधानाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक - 23, 24, 26, 27.
 
 
वृश्चिक : प्रलोभनांपासून दूर राहा
या आठवड्यातील प्राप्त ग्रहमान आपणास मनमौजी बनविणारे ठरू शकते. यामुळे हौस, मौज, व्यसने यावर आपला खर्च बराच वाढू शकतो. कुटुंबात एखादी मोठी आर्थिक जबाबदारी उचलावी लागू शकते. मित्रमंडळीतही पैसा द्यावा लागू शकतो. हे सारे व्यवहार करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे. गरज ओळखून पैसे खर्च केले पाहिजेत. व्यसनांवर नियंत्रण हवे. प्रलोभनांपासून दूर राहावयास हवे. काहींना जुनी दुखणी त्रस्त करू शकतील. एखाद्या कार्यक्रमामुळेही मोठा खर्च, सहकुटुंब प्रवास वगैरे घडू शकतो.
शुभ दिनांक - 22, 24, 27, 28.
 
 
धनु : आरोग्याची काळजी घ्या
weekely-horoscope : या आठवड्यात लाभलेले ग्रहमान फारसे अनुकूल दिसत नाही. त्यामुळे या सप्ताहात बर्‍याच गोष्टी, काही निर्णय त्रासदायक ठरू शकतात तसेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा आठवडा फारसा हितावह नाही. त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी. वाहने सांभाळून चालवा. कौटुंबिक जीवनातही काही योग तापदायक ठरू शकतात. दरम्यान, मुला-मुलींच्या शैक्षणिक प्रगतीच्या मार्गातील अडसर दूर होतील. काहींना विदेशात जाण्याच्या दृष्टीने हालचाल होताना दिसेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
शुभ दिनांक - 22, 24, 26, 28.
 
 
मकर : आर्थिक व्यवहारांमध्ये सावध
या आठवड्यात लाभलेली ग्रहस्थिती लक्षात घेता आपण आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगणे अतिशय आवश्यक आहे. सर्वप्रकारच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कोणावरही विसंबून राहू नये. पुरेशी खातरजमा करूनच व्यवहार पूर्ण करावयास हवेत. वादविवाद, भांडणे यासारख्या घटनांपासून दूर राहणेच बरे. आपल्या भोवतालच्या व्यक्तींना खात्री करूनच जवळ करा. कुसंगती टाळावयास हवी. एखादे नसते बालंट अंगावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपली महत्त्वाची कागदपत्रे, ऐवज सांभाळून ठेवा.
शुभ दिनांक - 22, 23, 24, 27.
 
 
कुंभ : व्यवसायात आगेकूच कराल
weekely-horoscope : या आठवड्यात लाभलेल्या ग्रहस्थितीमुळे कर्मस्थान सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे या सप्ताहात नोकरीच्या प्रयत्नात असणार्‍या युवकांना त्यांचा शोध पुरा करता येऊ शकेल. व्यवसायात आगेकूच करता येईल. मात्र, या सार्‍यात कुठेही आर्थिक व्यवहाराचा मुद्दा उपस्थित होत असेल तर त्याबाबत अतिशय सावध राहावयास हवे. कोणत्याही क्षणी गाफील राहून कोणावरही विश्वास टाकून आर्थिक व्यवहार करू नयेत. फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात ठेवावे. सर्वच आर्थिक व्यवहारात पुरेसे सावध असावे.
शुभ दिनांक - 23, 24, 26, 27.
 
 
मीन : संततीला शैक्षणिक सुयोग
weekely-horoscope : या आठवड्यातील ग्रहयोग पाहता आपल्या संततीला उत्तम संधी देणारा हा सप्ताह ठरू शकतो. कुटुंबातील मुलामुलींच्या प्रगतीच्या बातम्या आनंद देतील. अपेक्षेप्रमाणे लागलेले निकाल उत्साह व समाधानाचे वातावरण निर्माण करू शकतील. मुलांमध्ये नवा हुरूप संचरताना दिसेल. उच्च शिक्षणाचे बेत आखले जातील. त्यासाठीची आर्थिक तरतूददेखील होऊ शकेल. विशेषतः या घडामोडींमध्ये सारे कुटुंबच सहभागी झालेले दिसू शकेल. एखादा महत्त्वाचा कार्यक्रम ठरू शकतो. आनंद व उत्साहाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक - 23, 25, 26, 27.
 
मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746