नाटोची सदस्यता आणि रशिया !

Russia and NATOतुर्कस्तानचा अनपेक्षित विरोध

    दिनांक :24-May-2022
|
आंतरराष्ट्रीय 
- वसंत गणेश काणे
नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो) Russia and NATO ही जगातील काही राष्ट्रांमधली सैनिकी आघाडी ४ एप्रिल १९४९ ला नॉर्थ अ‍ॅटलांटिक करारानुसार Russia and NATO अस्तित्वात आली. यातील कलम ५ नुसार नाटोच्या कोणत्याही एका सदस्य देशावरील हल्ला हा सर्व देशांवरील हल्ला मानला जाईल, असे आहे. कलम १० नुसार, नवीन सदस्यतेच्या बाबतचा निर्णय सहमतीने होईल. सदस्य होऊ इच्छिणारा देश लोकशाहीप्रधान, व्यक्तिस्वातंत्र्य मानणारा आणि कायद्याच्या राज्यावर (रूल ऑफ लॉ) वर Russia and NATO विश्वास ठेवणारा असला पाहिजे.
 

nato  
 
नाटोचा विस्तारRussia and NATO
नाटोमध्ये उत्तर अमेरिकेतील कॅनडा व अमेरिका हे २ देश, युरोपमधील २६ देश, युरेशियातील तुर्कस्थान हे देश सदस्य आहेत. यात अ‍ॅटलांटिक महासागरातील स्वत:चे सैन्य नसलेले आईसलँड बेट जसे सदस्य आहे, तसेच ब्रिटन, फ्रान्स व अमेरिका हे अण्वस्त्रधारी देशही सदस्य आहेत. आज नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचे (नाटो) २०२२ मध्ये ३० सदस्य असले, तरी १९४९ साली फक्त १२ देशांनी म्हणजे डेन्मार्क, आईसलँड, नॉर्वे ही तीन नॉर्डिक राष्ट्रे आणि बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, इटली, लग्झेंबर्ग, नेदरलँड, पोर्तुगाल, युनायटेड किंग्डम (ब्रिटन), युनायटेड स्टेट्स (अमेरिका) यांनी नाटोची Russia and NATO स्थापना केली आहे. यावेळी फिनलँड आणि स्वीडन यांनी मात्र तटस्थ राहणे पसंत केले होते. पुढे १९५२ साली ग्रीस आणि तुर्कस्थान, १९५५ साली पश्चिम जर्मनी, १९८२ मध्ये स्पेन, १९९९ मध्ये वॉर्सा करारातून बाहेर पडलेले हंगेरी, झेक रिपब्लिक आणि पोलंड, २००४ मध्ये बल्गेरिया, एस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुनिया, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, २००९ मध्ये अल्बानिया, क्रोएशिया आणि आत्ता २०१७ मध्ये नॉर्थ मॅसेडोनिया नाटोत सामील झाले आणि नाटोची सदस्य संख्या ३० झाली.
 
 
 
आज नाटोच्या Russia and NATO सर्व सदस्य देशांचे मिळून सुसज्ज सैन्य दल सुमारे ३३ लक्ष तर राखीव सैन्य दल २१ लक्ष आहे. सर्व नाटो देशांची एकत्रित लोकसंख्या ९५ कोटी इतकी आहे. असे असले, तरी नाटो ही लष्करी वज्रमूठ म्हणता यायची नाही. कारण घटकात पुरेशी एकवाक्यता नाही. रागलोभाचे आणि धुसफुसीचे प्रकारही अधूनमधून डोकं वर काढत असतात. आता २०२२ मध्ये मात्र फिनलँड आणि स्वीडन यांनी तटस्थता सोडून नाटोमध्ये Russia and NATO सामील होण्याबाबत तातडीने अर्ज केले आहेत. सध्या युक्रेनमध्ये जे घडते आहे, ते पाहता यानंतर आपला नंबर आहे, हे कळण्याइतपत शहाणपण या देशांमध्ये नक्कीच आहे. शीतयुद्धाच्या काळात स्वीकारलेली तटस्थता या देशांनी सोडून देण्याचे ठरविले, ही या दशकातली फार मोठी घटना म्हटली पाहिजे. Russia and NATO रशियाने या देशांना सैनिकी आणि तांत्रिक कारवाईला तोंड द्यावे लागेल, याची नुसती जाणीवच करून दिली नाही तर फिनलँडचा वायू आणि वीज पुरवठा कमी केला. पण यांचे विजेचे ग्रीड इतर पुरवठादारांशीही जोडलेले असल्यामुळे रशियाच्या वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईचा यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही; उलट रशियाचेच दोन ग्राहक मात्र कमी झाले. इकडे नाटोचे Russia and NATO सेक्रेटरी जनरल जेम्स स्टोल्टेनबर्ग यांनी फिनलँड आणि स्वीडन यांचा नाटोत प्रवेश सहज आणि जलद गतीने होईल, असे आश्वासन या देशांना दिले आहे.
तुर्कस्तानचा अनपेक्षित विरोध
‘कहानी में ट्विस्ट' या न्यायाने तुर्कस्थान यांच्या प्रवेशाच्या विरोधात उभा राहिला आहे. Russia and NATO हे दोन्ही देश दहशतवाद्यांच्या माहेरघरासारखे आहेत. तुर्कस्तानमधून पळून गेलेल्या कुर्द बंडखोरांना यांनी आश्रय दिला आहे; शिवाय सध्या अमेरिकेत आश्रयाला असलेल्या तुर्कस्तानच्या बंडखोर नेत्याला, म्हणजे फेथुल्ला गुलेन यालाही स्वीडनने आश्रय दिला होता, असे तुर्कस्तानचे आरोप आहेत. फिनलंडचे अध्यक्ष सॉली निनिस्टो यांनी पुतिन यांना प्रत्यक्ष फोन करूनच सांगितले की, युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणानंतर आमच्या सुरक्षेबाबतही मूलभूत स्वरूपाचे प्रश्न निर्माण होत असल्यामुळे आम्ही नाटोत सामील होत आहोत. उत्तरादाखल पुतिनने त्यांना बजावले की, काळाच्या कसोटीवर उतरलेली आपली तटस्थतेची भूमिका सोडून तुम्ही मोठीच चूक करीत आहात. आज तुमच्या सुरक्षेला धोका नाही, पण तुमच्या नाटोमध्ये Russia and NATO सामील होण्याच्या निर्णयाचा मात्र नेमका उलटा परिणाम होईल आणि आजवरचे तिघे चांगले शेजारी आणि सहकारी एकमेकांपासून दुरावतील. फिनलंडची १३०४ किमी लांबीची पूर्वसीमा रशियाला लागून आहे. सामिलीकरणानंतर रशियाची नाटो सदस्य देशांशी असलेली सीमा दुप्पट लांब होणार आहे. ही बाब रशियाची सुरक्षाविषयक चिंता वाढविणारी असणार आहे.
तटस्थता का सोडली?
Russia and NATO रशियाचे धमकी देणे, रशियाचे इतर देशांच्या निर्णय स्वातंत्र्यावरच घाला घालणे आणि युक्रेन या स्वतंत्र देशावर आक्रमण करणे या तीन कारणास्तव फिनलंड आणि स्वीडन यांनी नाटोत सामील होण्याचा निर्णय घेतला. नाटोची सदस्यता देण्याची प्रक्रिया बरीच किचकट आहे. यासाठी संबंधित देशाच्या संसदेची मान्यता असावी लागते तसेच सर्वच नाटो सदस्यांची अनुमतीही असावी लागते. पण तुर्कस्तानची समजूत काढण्यात हे दोन देश यशस्वी होतील, अमेरिका आपले वजन वापरील, मध्यस्थी करील आणि हा प्रवेश कमीत कमी वेळात होईल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. Russia and NATO आपापला सैनिकी खर्च वाढवीत, डेन्मार्क, फिनलँड, स्वीडन, नॉर्वे आणि आईसलँड हे पाच देश सुरक्षाविषयक प्रश्नांबाबत एकत्र आले आहेत आणि त्यांची बाल्टिक समुद्रावर पक्की पकड निर्माण झाली आहे.Russia and NATO
 
इकडे रशियाला युक्रेन युद्धात अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही, हे आता रशियासकट सर्वांनाच पटलेले दिसते आहे. राजधानीचे कीव शहर तर सोडाच; Russia and NATO पण रशियाच्या सीमेपासून जवळ असलेले युक्रेनमधील दुस-या क्रमांकाचे खारकीव शहरही रशियाला ताब्यात घेता आलेले नाही. युक्रेन मोहिमेबाबत रशियातून झिरपत बाहेर आलेल्या आणि जागतिक वृत्तसृष्टीने विश्वसनीय म्हणून प्रसारित केलेल्या वार्ता तर वेगळ्याच आहेत. पुतिन यांना कॅन्सरसारखा गंभीर आजार झाल्याचे वृत्त बाहेर आले आहे. पुतिन यांच्या खास विश्वासातल्या पाच सल्लागारांचे एक मंडळ (किचन कॅबिनेट) आहे. Russia and NATO यापैकी चौघांनी युक्रेनबाबतची रशियाची युद्धनीती चुकली, असे निक्षूण सांगितल्याचे वृत्त आहे. मारियुपोलचा अपवाद वगळता गेल्या तीन महिन्यांच्या युद्धकाळात रशियन फौजा जितकेदा मुलूख काबीज करीत पुढे गेल्या आहेत, तितकेदा त्यांना दुसरीकडे कुठे ना कुठे माघार घ्यावी लागली आहे. आता रशिया जगात एकटा पडत चालला आहे, असे परखड विचार पुतिन यांच्या किचन कॅबिनेटमध्ये व्यक्त झाल्याची माहिती बाहेर आली आहे.
रशियाने भूमिका खरंच बदलली का?
Russia and NATO जागतिक राजकारणात केव्हा आणि नक्की कशामुळे काय घडले किंवा घडेल, याचे भाकीत वर्तविणे कठीण असते. पण पुतिन यांचा घुमजाव प्रकारचा एक निर्णय पुरेसा बोलका आहे. काही देश नाटोत नुसते सामील होत असतील तर त्याला आपला विरोध असणार नाही, असे पुतिन यांनी फिनलँड आणि स्वीडन यांना कळविले आहे, असे वृत्त समोर आले आहे. पण Russia and NATO नाटोची शस्त्रे, नाटोची केंद्रे, नाटोचे सैनिक या देशात आलेले आपल्याला चालणार नाहीत, अशी ताकीद मात्र पुतिन यांनी याच पत्रात दिली आहे. प्रत्यक्षात ही ताकीद नसून हे रशियाने आपले एक पाऊल मागे येण्यासारखेच आहे. फिनलँड आणि स्वीडन यांनी तर सुरुवातीलाच खुलासा केला होता की, Russia and NATO नाटोत सामील होण्याचा प्रस्ताव आम्ही जेव्हा नाटोकडे पाठविला तेव्हा त्यात हा मुद्दा आम्ही स्वत:हूनच टाकलेला आहे. आम्हाला फक्त नाटो करारातील कलम ५ चेच संरक्षण हवे आहे.
 
Russia and NATO एका सदस्य राष्ट्रावर आक्रमण झाले तर ते इतर राष्ट्रांवरही झालेले आक्रमण आहे, असे मानून सर्व सदस्य त्या राष्ट्राच्या मदतीला धावून जातील, अशा आशयाचे ते कलम आहे. गेल्या काही दशकांपासून रशिया नाटोला विरोध करीत आला आहे. नाटोत नवीन सदस्य सामील होणे, ही बाब रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्यासारखीच आहे, असे आता रशियाला वाटत नसेल, तर तो इतर राष्ट्रांना आपला विजयच वाटणार आहे. Russia and NATO तो रशियाला आपला पराभव वाटत नसेल तर ते इतरांसाठी चांगलेच आहे. पण राजकारणात उक्ती आणि कृती यात नेहमीच फरक आढळत आला आहे. आता हेच पाहा ना! रशियन क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकतील, अशी वाहने रशियाने फिनलँड आणि रशिया यांच्यामधील सीमेवर तैनात करायला सुरुवात केली असल्याचे वृत्तही याच सुमारास समोर येत आहे. मग खरे पुतिन कोणते? यातली हूल कोणती आणि वस्तुस्थिती कोणती? असे ज्यांच्या बाबतीत सांगता येत नाही, तेच खरे राजकारणी, असे तर नाही ना?
 
- ९४२२८०४४३०